घरठाणेनगरसेवक सचिन खेमा यांना मोक्का कलम लावू नका

नगरसेवक सचिन खेमा यांना मोक्का कलम लावू नका

Subscribe

भाजपाचे पोलिसांविरुद्ध आंदोलन

कल्याण जोशीबाग परिसरातील भाजपाचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून मोक्का अंतर्गत पोलिसांनी कार्यवाही सुरू केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या निषेधार्थ याविरोधात विभागीय कार्यालयावर 29 जानेवारी रोजी मोर्चाचे आयोजन केली असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या परिसरात सलग दोन दिवस भाजपाचे माजी नगरसेवक सचिन खेमा आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही दिवसानंतर पोलिसांनी खेमा आणि त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले होते. परिसरातील पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असून भाजपाच्या नगरसेवकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार याकामी फूस लावत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

पोलीस त्यांचे कर्तव्य व्यवस्थितरीत्या पार पाडत नसून खोट्या गुन्ह्यात माजी नगरसेवक सचिन खेमा यांना अडकवत मोक्का अंतर्गत कारवाई करत आहेत. या मोक्का कलमाला भाजपाचा तीव्र विरोध असल्याने या संदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयावर माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपाचे पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 29 जानेवारी रोजी सकाळी ११ च्या दरम्यान मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात कल्याण-डोंबिवलीतील भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जनरल सेक्रेटरी अर्जुन म्हात्रे, पंकज उपाध्याय उपस्थित होते.

पोलिसांच्या कार्यालयात गुन्हेगारांची उठबस
यावेळी कल्याणच्या डीसीपी कार्यालयात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींचा वावर होत असल्याचा गंभीर आरोप नरेंद्र पवार यांनी केला.

- Advertisement -

भाजपा नगरसेवकांना सेनेची ऑफर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे नेते भाजपाच्या नगरसेवकांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर देत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.

परवानगी नाकारल्यास तरीही मोर्चा
पोलीस प्रशासनाच्या विरोधात भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी काही कारणास्तव नाकारल्यास तरीही मोर्चा धडकणार असल्याचा स्पष्ट इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -