घरठाणेसार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ सेवन

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ सेवन

Subscribe

डोंबिवलीत शाळा, कॉलेज परिसरात ५० जणांवर कारवाई

नशामुक्त शहर करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध मोहिम राबवली जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली पोलिसांनी विशेष मोहिम राबवली आहे. शाळा कॉलेज, स्टेशन परिसर व सार्वजनिक ठिकाणी सिगरेट तंबाखू सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई झाली आहे.या कारवाईत दोन तासात ५० जणांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू सेवन केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याची बजावली नोटीस बजावण्यात आली आहे.तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल करण्यात आले.

कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि डोंबिवली विभागाचे सहायक आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, टिळक नगर आणि मानपाडा पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. या चारही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी विविध पथक नेमले आहे.स्टेशन परिसर, बस स्टॉप, ओपन जीम, उद्याने, शाळा,कॉलेज परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना, तंबाखू खाताना किंवा कोणतेही अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करत न्यायालयात हजर राहण्याची नोटीज बजावण्याची मोहीम हाती घेतली.कारवाईच्या पहिल्याच दिवशी दोन तासात ५० जणांवर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -