घरठाणेउल्हासनगरात झोपडपट्टी धारकांना तीनशे फुटाचे घर मोफत मिळणार !

उल्हासनगरात झोपडपट्टी धारकांना तीनशे फुटाचे घर मोफत मिळणार !

Subscribe

उल्हासनगरात 2000 पूर्वीच्या झोपडपट्टी धारकांना 300 चौ फुटाचे घर मोफत मिळणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनवर्सन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोमण यांनी उल्हासनगर महानगरपालिकेत आयोजित एका कार्यक्रमात दिली. उल्हासनगरच्या एकूण 268 झोपडट्ट्यांचे सर्वेक्षण झाले असून या झोपडपट्टयांचे नगररचना विभागाच्या वतीने पुनर्वसन योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सभागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत एमएमआरडीए उपमुख्य अभियंता नितीन पवार, कार्यकारी अभियंता राजकुमार पवार, उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी ठाकूर, उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी गजानन भोईर, सहकार अधिकारी सय्यद सलीम दावलशा, सहायक अभियंता निलेश सावंत, उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अक्षय ढाकणे आणि नगरभूमापन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 13.4 चौ. किमी. क्षेत्रफळापैकी 4.5 चौ. किमी. मध्ये जवळपास 33 टक्के क्षेत्रावर झोपडपट्ट्या असून यात 268 झोपडपट्ट्याचे सर्वेक्षण झाले. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभाविपणे राबविता येईल आणि त्याचा फायदा झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या गोरगरिब जनतेला होईल, अशी ग्वाही मनपा आयुक्त अजीज शेख दिली. तसेच या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना सोमण यांनी असे स्पष्ट केले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना उल्हासनगरमध्ये घराघरात होणार्‍या औद्योगिक परिस्थितीची जाण ठेवून योजना राबविण्याचा मनसुबा शासनाचा आहे.
या योजने अंतर्गत मोठमोठे टॉवर उभारण्यात येणार असून त्यात सन 2000 पूर्वीच्या झोपडपट्टी धारकांना 300 चौ. फुटाचे घर विनामूल्य देण्यात येईल. तसेच या योजनेनंतर्गत विकासक यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेऊ असे सोमण यांनी आश्वासित केले आहे. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या विकासक व वास्तुविशारद यांनी मोठा प्रतिसाद दिला. या प्रसंगी उपस्थित सर्व उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी, वास्तुविशारद व विकासक यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेबाबतच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -