घरठाणेठाण्यात पितांबरी शॉपीचे उद्घाटन; लवकरच फिरते दुकान होणार

ठाण्यात पितांबरी शॉपीचे उद्घाटन; लवकरच फिरते दुकान होणार

Subscribe

पितांबरी शॉपीच्या उद्घाटनानंतर आता ठाण्यात लवकरच फिरते दुकान सुरू होणार असल्याची घोषणा पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केली.

पितांबरी शॉपीच्या उद्घाटनानंतर आता ठाण्यात लवकरच फिरते दुकान सुरू होणार असल्याची घोषणा पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केली. तसेच ठाण्यातील मनाचा रस्ता असलेल्या गोखले रोडवर दुकान सुरू करण्याचे स्वप्न ही या शॉपीच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच ठाणेकर नागरिकांना दोन दिवस २५ टक्के सूट दिली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. पितांबरी शॉपीचे उदघाटन भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सुनेश जोशी, पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई पितांबरीच्या व्हाइस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई, सीईओ माधव पुजारी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डावखरे यांनी शुभेच्छा दिल्या.

पितांबरीच्या उत्पादनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. १६५ वेगवेगळ्या प्रमाणातील पितांबरीची ८२ उत्पादने सर्वत्र उपलब्ध आहेतच. परंतु ती हेल्थकेअर, होमकेअर अशा १० वेगवेगळ्या विभागातील असल्याने ती एकाच ठिकाणी मिळणे शक्य होत नाही. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन पितांबरीने हेमेंद्र सोसायटी गोखले रोड, ठाणे येथे नवीन पितांबरी शॉपी सुरू केली आहे.

- Advertisement -

पितांबरीची सर्व उत्पादने या पितांबरी शॉपीमध्ये मिळतीलच परंतु त्यासोबतच पितांबरीची नवीन उत्पादनेदेखील इथे ग्राहकांना सर्वप्रथम खरेदी करता येतील. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात म्हणजेच हॅपी अवर्समध्ये या पितांबरी शॉपीमधून खरेदी करणार्‍या ग्राहकांना वर्षभर सवलत उपलब्ध असेलच. त्याशिवाय शुभारंभाच्या निमित्ताने पितांबरीच्या उत्पादनांवर ग्राहकांसाठी खास सवलत जाहीर करण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी पितांबरी शॉपीला आजच भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पितांबरीच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा –

एका गुन्ह्यातून सुटका होताच आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -