घरमुंबईएका गुन्ह्यातून सुटका होताच आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक

एका गुन्ह्यातून सुटका होताच आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक

Subscribe

आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि १० हजारांचा दंड

पॉस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यातून आरोपीची सुटका होताच तो दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अडकला आहे. मुलीच्या गालाला स्पर्श केल्याप्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यातून आरोपीची विशेष न्यायालयाने सुटका केली. यावेळी कोर्टाने आरोपीच्या बाजूने निर्णय देत मुलीच्या गालाला स्पर्श केला यामध्ये कोणताही लैंगिक छळाचा हेतू नव्हता त्यामुळे हा स्पर्श गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे २८ वर्षीय तरुणाची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली. मात्र याचदरम्यान मुलीच्या आईने आरोपीवर विनयभंगाला गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे पाच वर्षीय मुलीच्या आईचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला दोषी ठरवून एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी विनयभंग पीडित आईच्या माहितीनुसार, आरोपी व्यवसायाने इलेक्ट्रिशिअन असून तो घरातील रेफ्रिजरेटर दुरुस्त करण्यासाठी आला होता. दुपारी अडीच्या सुमारास वॉचमननेच या इलेक्ट्रिशिअनला प्रवेश दिला होता. यावेळी पीडितेचे पती कामानिमित्त बाहेर होते. परंतु घरात पीडित महिला आणि दोन मुलं होती. दरम्यान रेफ्रिजरेटरमधील बिघाड झालेले काही पार्ट बदलावे लागतील आणि ते आणावे लागतील असे सांगून ते पार्ट बाहेर जाऊन घेऊन आला. यावेळी घरातील कोण पुरुष नसल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेचा विनयभंग केला.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रेफ्रिजरेटचे पार्ट बाहेर जाऊन घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर आरोपीने मुलीच्या गालाला स्पर्श केला. यावर ती त्याला ओरडली आणि किचनमध्ये निघून गेले. याचवेळी आरोपीही तिच्या मागोमाग किचनमध्ये गेला आणि तिला मागून मिठी मारली. यावेळी तिने आरोपीला धक्का देत बाजूला केले. त्याचे कामाचे पैसे देऊन त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र आरोपीने घरातून न जाता पीडितेचा गळा आवळला आणि जवळ खेचून घेतले. यावेळी पुन्हा विरोध केल्यानंतर तो निघून गेला. पण जाण्याआधी आरोपीने मुलीच्या गालाला पुन्हा एकदा स्पर्श केला. यावेळीही पीडिता आरोपीवर पुन्हा ओरडली. यानंतर पीडित महिलेने इमारतीच्या सुपरव्हायझरला आणि बहिणीला फोन करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी तात्काळ पीडितेचा भाऊ घटनास्थळी पोहचला आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पीडितेने पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी आरोपीला अटक त्याच्याविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र या आरोपातून आरोपी जामीनावर सुटला. परंतु कोर्टाने आरोपीला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवत अटक केली. त्यामुळे या दुसऱ्य़ा प्रकरणात आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -