Farmer Protest: रिहानाच्या हाती पाकिस्तानी झेंडा

photo of Rihanna with Pakistani flag goes viral after singer tweets supporting farmers' protest
Farmer Protest: रिहानाच्या हाती पाकिस्तानी झेंडा

सध्या आपण सोशल मीडियावर इंटरनॅशनल कलाकार आणि भारतीय कलाकारमधला वाद पाहत आहोत. शेतकरी आंदोलनाला इंटरनॅशनल कलाकार पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत. पण भारतीय कलाकारांनी त्यांच्यावर निशाणा साधून टिका केली आहे. सध्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारी अमेरिकन प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटमध्ये रिहानाच्या हाती पाकिस्तानी झेंडा असल्याचे दिसत आहे. पण या फोटोमागचं नेमकं सत्य काय? ते पाहा.

उत्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ता शलभ मनी त्रिपाठी आणि भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता अभिषेक मिश्राचा रिहानाचा फोटो व्हायरल करण्यामागे हात आहे. रिहानाचा हा फोटो पहिल्यांदा मिश्राने ट्विट केला होतो. त्यानंतर त्रिपाठीने रिट्विट केला. मग रिहानाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण या फोटो मागचं सत्य समोर आलं आहे. गुगलवर हा फोटो रिव्हर्स सर्च केल्यानंतर आयसीसीचं जुलै २०१९ मधलं एक ट्विट समोर येते. आयसीसीने ट्विट केलेल्या फोटोमध्ये रिहानाने वेस्ट इंडिजचा झेंडा हातात घेतल्याचे दिसत आहे. पण आता हाच फोटो एडिट करून रिहानाच्या हातात पाकिस्तानच झेंडा दाखवण्यात आला आहे.

२०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये रिहाने वेस्ट इंडिज टीमला पाठिंबा देत होती. त्यादरम्यानचा रिहानाचा हा फोटो असून तो सध्या एडिट करून व्हायरल केला जात आहे. रिहानाच्या हातात पाकिस्तानी झेंडा नसून वेस्ट इंडिजचा झेंडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा – ‘या मुर्खांना कोणी विकत घेतलं?’, अमांडा सर्नीचा भारतीय सेलिब्रिटींवर निशाणा