घरठाणेनमो महारोजगार मेळाव्यात 21 हजार 166 उमेदवारांच्या मुलाखती

नमो महारोजगार मेळाव्यात 21 हजार 166 उमेदवारांच्या मुलाखती

Subscribe

8 हजार 210 उमेदवारांची झाली प्राथमिक निवड

ठाणे । कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे पश्चिम-400604 येथे 06 मार्च 2024 नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या मेळाव्यासाठी एकूण 61 हजार 805 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. उमेदवारांच्या तिथेच मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यात दि.06 मार्च 2024 रोजी 298 उद्योजकांच्या उपस्थितीत 21 हजार 166 उमेदवारांची मुलाखती झाल्या. यापैकी 8 हजार 210 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 1 हजार 140 उमेद्वारांची अंतिम निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार यांनी दिली आहे.
या मेळाव्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय रविंद्र सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार किसन कथोरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव, ओम प्रकाश गुप्ता, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त निधी चौधरी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, दिपक चव्हाण, विकास गजरे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -