घरठाणेManohar Madhvi: माजी नगरसेवक मढवी यांच्यासह दोघांना पोलीस कोठडी

Manohar Madhvi: माजी नगरसेवक मढवी यांच्यासह दोघांना पोलीस कोठडी

Subscribe

नवी मुंबई परिसरात केबलच्या खोदकामासाठी अडीच लाखांची खंडणी घेणार्‍या उद्धव सेनेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोहर मढवी आणि त्यांचे चालक अनिल मोरे या दोघांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले आहेत.

ठाणे: नवी मुंबई परिसरात केबलच्या खोदकामासाठी अडीच लाखांची खंडणी घेणार्‍या उद्धव सेनेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोहर मढवी आणि त्यांचे चालक अनिल मोरे या दोघांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दिली.

कळव्यातील वाघोबानगर भागात राहणारे त्रिभुवन सिंग यांना एका कंपनीने ऐरोली परिसरात खोदकाम करुन इंटरनेट केबल टाकण्याचा ठेका दिला आहे. हेच खोदकाम सुरू असताना मढवी यांनी सिंग यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून तसेच त्यांच्या कळव्यातील घरी असतांना वारंवार फोन करुन अडीच लाख रुपये न दिल्यास ऐरोलीतील हे केबलचे खोदकाम बंद पाडण्याची धमकी दिली होती. मोबाईलवरील हेच संभाषण सिंग यांनी रेकॉर्डही केले होते. अडीच लाखांपैकी दीड लाख रुपये 26 एप्रिल रोजी सिंग यांच्याकडून मढवी यांनी घेतले. याचाच व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. याबाबतची तक्रार आल्यानंतर 27 एप्रिल रोजी उर्वरित एक लाख रुपये ऐरोलीतील पक्ष कार्यालयात त्यांचा चालक मोरे यांच्या मार्फत घेताना मोरे आणि मढवी या दोघांनाही सापळा रचून विशेष कृती दलाचे सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली होती. ठाण्याच्या विशेष न्यायालयाने या दोघांनाही 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -