घरठाणेठाण्यात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; पोलिसाचे पाकीट केले परत

ठाण्यात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; पोलिसाचे पाकीट केले परत

Subscribe

ठाणे – एका रिक्षाचालकामुळे सर्वच रिक्षाचालक बदनाम होत आहेत. त्यातच अजून प्रामाणिकपणा काही रिक्षाचालकांमध्ये बाकी असल्याचे उदाहरण या ना त्या कारणाने पुढे येत आहेत. शनिवारी सकाळी कामावर चाललेले नवीमुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार संतोष प्रभाकर रोडेकर हे रिक्षातून उतरताना भ्रमणध्वनी (फोन) बोलत सुट्टे पैसे देत होते. त्यावेळी खिशातील पाकीट रिक्षात पडले. हजारो रुपयांसह इतर कागदपत्रे असलेले पाकीट लोकमान्यनगर येथील रिक्षाचालक सुनील साळुंखे यांनी त्या पोलीस हवालदाराला परत करत ठाण्यातील रिक्षाचालकांमधील प्रामाणिकपणा दाखवून दिला.

पोलीस हवालदार रोडेकर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील सुरक्षा शाखा येथे कर्तव्यावर निघाले होते. त्यासाठी पांच पाखाडी, गुरूकुल सोसायटी परिसरातून ते रिक्षामध्ये ठाणे स्टेशनला जाण्यासाठी बसले. ते गावदेवी मंदिराजवळ उतरताना त्यांना एक फोन आला. फोनवर बोलत ते रिक्षाचे भाडे ते होते. त्यावेळी सुट्टे पैसे काढताना त्यांचा पाकीट रिक्षामध्ये राहून गेले. गडबडीत पोलीस हवालदार रोडेकर हे लोकल पकडण्यासाठी गेले. लोकलमध्ये बसल्यावर पाकीट पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखेसह नौपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. याचदरम्यान रिक्षाचालक साळुंखे यांना रिक्षाच्या मागील सीटवर पाकीट दिसले. पाकिटमध्ये पैसे आणि पोलीस आय कार्ड व इतरही कार्ड होते. त्यांनी ही बाब तातडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या कानावर घातली. तर जगदाळे यांनी ठाणे शहर पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांना सांगितली. सह पोलीस आयुक्त कराळे यांनी पाकीट त्यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार साळुंखे यांनी पाकीट जाऊन सह पोलीस आयुक्त कार्यालयात जमा केले. अशाप्रकारे काही तासात ते पाकीट सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून नवीमुंबई पोलिसाला मिळाले. याप्रसंगी कार्यालयीन कर्मचारी पोलीस हवालदार सुनील शेळके,पोलीस नाईक सचिन पाटील यांच्यासमवेत रिक्षाचालक सुनील साळुंके आणि त्यांचा मुलगा ही उपस्थित होता. तर सह पोलीस आयुक्त कराळे यांनी रिक्षाचालक साळुंखे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.तर रोडेकर यांनी रिक्षाचालक साळुंखे यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -