घरमहाराष्ट्र...मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

…मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Subscribe

जळगाव – काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते, अश्या चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका . मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय. असे म्हणत शिव संवाद यात्रेसाठी जळगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे बॅनर फडणाऱ्या नतदृष्टांवर आदित्य ठाकरे यांनी निशाण साधला .

राज्यात सुरू असलेलं घाणेरडे राजकारण तुम्हाला मान्य आहे का ? तुमच्या आमदारांची गद्दारी केली ते तुम्हाला मान्य आहे का? हेच तुम्हाला विचारायला आलोय, सांगायला आलोय. असे म्हणत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जळगावात शिवसैनिक आणि नागरिकांना संबोधित केले. आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे .

- Advertisement -

यावेळी बोलताना ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राचे सरकार पाडून गुवाहाटीला जिथे ओला दुष्काळ होता, तिथे तुम्ही मजा मारत होता . ४० जण गद्दारी करून गेले, ते स्वतःसाठी गेले, जनतेसाठी नाही . ५० थर लावले बोलतायात , ५० थर नाही ५० खोके लावलेत तुम्ही, एवढे खोके म्हणतात पण लोकांमध्ये ते आले का? नवीन काही घडलंय का ? जनतेसाठी काही आलंय का? गेलेल्यांना काय मिळाले ? उलट आधी चांगली खाती तरी होती. तुमच्या माथ्यावर गद्दारीच कलंक कायम राहणार. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही.’ असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -