घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगणेशोत्सव करमुक्त झाला, निर्बंधमुक्त होऊन 'डिजे' वाजणार ?

गणेशोत्सव करमुक्त झाला, निर्बंधमुक्त होऊन ‘डिजे’ वाजणार ?

Subscribe

नाशिक : सणउत्सव निर्बंधमुक्त, करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी नाशिक महानगरपालिकेने केली आहे. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांना आकारण्यात येणारी सर्व कर माफ करण्यात आली आहेत. तसेच भरलेल्या करांचा परतावाही केला जाणार असल्याच सांगण्यात आल आहे. शनिवारी (दी.२०) झालेल्या आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या बैठकीत ठराव करून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव करीता महानगरपालिकेच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणारे मंडप, स्टेज, कमान इत्यादिंचे परवाना कर चालू आर्थिक वर्षाकरीता (२०२२) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचसोबत मूर्तिकारांनाही दिलासा देताना त्यांच्या मंडपांना लागू असलेला करही माफ करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सवावरही अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मूर्तीची उंची, कार्यकर्त्यांची संख्या, भाविकांवरील बंधन इत्यादी कारणांनी दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मंडळांचे कार्यकर्ते भाविक सगळ्यांमध्येच आनंदच वातावरण आहे. दरम्यान, सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली. परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्याच महापालिकेच्या वतीने सांगण्यात आल आहे.

- Advertisement -

बैठकीत झाली होती मागणी

दोनच दिवसापूर्वी नाशिक पोलिस आयुज्त जयंत नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पोलिस, महापालिका, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन, परिवहन आणि गणेशोत्सव मंडळ याच्या संयुक्त बैठकीत मागील दोन वर्षाचे निर्बंध, त्याच सोबत जाहिरातींचा कमी झालेला कल, निधीचे आटलेले स्त्रोत यामुळे मंडळांची झालेली आर्थिक कुचंबणा लक्षात घेऊन महानगरपालिकेचे कर माफ करावे अशी मागणी पुढे आली होती. आणि त्याच अनुषंगाने आता पालिका प्रशासनाने घेतलेल्या करमुक्तीच्या निर्णयाच मंडळांनी स्वागत केल आहे.

 डिजे वाजणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे महानगर पालिका आयुक्तांनी गणेशोत्सव करमुक्त केला आहे. आता पोलिस आयुक्त निर्बंधमुक्त करण्याच्या दृष्टीकोणातून निर्णय घेत डिजेला परवानगी देणार का याकडे आता गणेशभक्तांचे आणि गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी (दी.१९) झालेल्या दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे, ठाणे या शहरात मोठ्या प्रमाणात डिजेचा दणदणाट बघायला मिळाला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंडळ असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथेही डिजेच्या आवाजात दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. त्यामुळे मागील काही वर्षात झालेली नाशिककर डिजे प्रेमींची उपेक्षा यंदा दूर होईल आणि डिजेला परवानगी मिळेल अशी आशा गणेशभक्त व मंडळांना लागली आहे. दरम्यान, बुधवारी (दी.१७) झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनीही ‘वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यास विचार करू’ असे सांगत सकारात्मक्ता दर्शवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -