घरठाणेवीजपुरवठा बाधित प्रकरण शासकीय रुग्णालय प्रशासनाशी संबंधित-महावितरण

वीजपुरवठा बाधित प्रकरण शासकीय रुग्णालय प्रशासनाशी संबंधित-महावितरण

Subscribe

उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयाचा वीजपुरवठा सोमवारी (10 जुलै) रात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत बंद राहण्याचा प्रकार रुग्णालय प्रशासनाशी संबंधित आहे. या कालावधीत या भागातील वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत सुरू होता, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय महावितरणच्या साईबाबा स्विचिंग स्टेशनवरून निघणार्‍या 22 केव्ही मार्केट फीडरवरील उच्चदाब ग्राहक आहे. सोमवारी रात्री 9 वाजून एक मिनिटांनी मार्केट फिडर ट्रिप झाला. अवघ्या पाच मिनिटांनी रात्री 9 वाजून सहा मिनिटांनी या फिडरचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. उच्चदाब ग्राहक असल्याने ट्रान्सफॉर्मर व त्यापुढील वीज पुरवठ्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णालय प्रशासनाने विनंती केल्याने सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी महावितरणच्या तंत्रज्ञाने रुग्णालयाच्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली. यात ट्रान्सफॉर्मरचा एक डीओ युनिट तुटलेला आढळला. यासंदर्भात माहिती देऊन दुरुस्ती करण्याची सुचना महावितरणच्या कर्मचार्‍यांने रुग्णालय प्रशासनाला दिली.

दुरुस्तीसाठी मंगळवारी 11 जुलै रोजी दुपारी पावणेदोन वाजता अर्ध्या तासासाठी शटडाऊन जंप ओपन करून देण्यात आला. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजता फीडर पूर्ववत सुरू करण्यात आला. रुग्णालय प्रशासनासाठी देखभाल-दुरुस्तीचे काम करणार्‍या संबंधितांना फक्त सदोष भागाचे काम करण्याची स्पष्ट सूचना दिली होती. परंतु संबंधित काम करणार्‍यांनी एक्सवॅक्स ओपरेटेड उपकरण (जीओडी) संपूर्ण बदली केली, तसेच डीओ सेटही बदलला. त्यामुळे त्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटापर्यंतचा कालावधी लागला. या कालावधीत महावितरणमुळे नाही तर रुग्णालय प्रशासनामुळे वीजपुरवठा बाधित झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -