घरठाणेएसटी महामंडळाच्या बसचा अपघात

एसटी महामंडळाच्या बसचा अपघात

Subscribe

15 जखमी

वाडा आगारातून शहापूरच्या दिशेने येणार्‍या एसटी महामंडळाच्या बस शहापूर तालुक्यातील अघई – आटगांव रस्त्यावर कलंडल्याने बसमधील 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर अघई गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. तर चालक पंकज फुलपगार यांना स्टेरिंगचा मार बसल्याने त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात घडला. वाडा आगारातील ही बस शहापूरकडे येतांना अघई ते आटगांव दरम्यान असलेल्या पळसाचे वळण येथे शहापूर दिशेकडून भरधाव वेगात आलेल्या वॅगेनार कारला वाचवताना ही बस रस्त्याच्या कडेला कलंडली. बस चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. शहापूर आगारातून माहिती देण्यात आली. पुणधे ते अघई हा रस्ता अरुंद असून या रस्त्याला साईडपट्टी नसल्याने येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहनचालकांकडून बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -