घरठाणेभिवंडीतील डोंगरमाथा बनले पर्यटन स्थळ

भिवंडीतील डोंगरमाथा बनले पर्यटन स्थळ

Subscribe

अपघात होण्याची भीती

भिवंडीच्या नारपोली ते कामतघर हद्दीत नारपोली पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या डोंगरमाथ्याला स्थानिक तरुणांनी आणि लोकांनी पर्यटन स्थळ बनवले आहे. या डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी रस्ता नसतानाही लोक जीव धोक्यात घालून डोंगराच्या टोकावर जात आहेत. तर तरुणवर्ग चढण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करून धोकादायक ठिकाणी सेल्फीही घेत आहेत. त्यामुळे या टेकडीवर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली असून या प्रकरणी महसूलविभाग, महानगरपालिका आणि पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. शहरातील महानगरपालिका क्षेत्रात मानसरोवर, फुलेनगर, बीएनएन कॉलेजच्या मागे, नारपोली साईप्रसन्न सोसायटी, साठे नगर, अंजूरफाटा यासह विविध भागात अनेक डोंगर आहेत.

त्यापैकी काही डोंगर फोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदारांना कंत्राटावर देऊन उत्खनन केले आहे. तर काही ठिकाणी लोकांनी विनापरवाना उत्खनन केले आहे. त्यामुळे हे डोंगर धोकादायक झालेले आहे. शहरात फिरण्यासाठी अथवा करमणुकीसाठी पालिकेचे बागबगीचे नाहीत. तर काही बगीचे केवळ महिला व बालकांसाठी असल्याने तरुणांनी आपला मोर्चा डोंगर माथ्याच्या टेकड्याकडे वळविल्याने हे ठिकाणे पर्यटन स्थळ बनले आहेत. सुट्टीच्या दिवशी शुक्रवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी असते. शहरातील कामगारवगाची टेकड्यांवर गर्दी होऊ लागली आहे. वर्‍हाळादेवी मंदिरामागील पद्मश्री आण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या डोंगरावरील टेकडीवर चढण्यासाठी रस्ता नसताना देखील स्थानिक लोक आपला जीव धोक्यात घालून चढत आहेत. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह तरुणांची संख्या मोठी आहे. हे सर्व उंचावरून त्यांचा जीव धोक्यात घालून सेल्फी काढतात. आश्चर्यजनक बाब म्हणजे या टेकडीवर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोक घसरून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या ठिकाणी सावधगिरीचा फलक लावण्यात आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -