घरपालघरकेळवे बीच पर्यटन महोत्सव 24 नोव्हेंबरपासून

केळवे बीच पर्यटन महोत्सव 24 नोव्हेंबरपासून

Subscribe

या महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार असून त्याचबरोबर घरोपयोगी लागणार्‍या रेडीमेड वस्तूंचे स्टॉल सेमी कार्पोरेट विभागात लागणार असून काही नामांकित कंपन्यांचे स्टॉल कार्पोरेट विभागात लागणार आहेत.

पालघर: केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाच्या माध्यमातून 24, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी चौथ्या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या महोत्सवात खासदार राजेंद्र गावित, आमदार मनीषा चौधरी, आमदार श्रीवास वनगा आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केळवे येथील पर्यटनाचा प्रसार आणि त्याचबरोबर परिसरातील विविध जाती धर्मातील परंपरा आणि खाद्यपदार्थांचा प्रचार व प्रसार करणे आणि त्यातून स्थानिकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.या महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार असून त्याचबरोबर घरोपयोगी लागणार्‍या रेडीमेड वस्तूंचे स्टॉल सेमी कार्पोरेट विभागात लागणार असून काही नामांकित कंपन्यांचे स्टॉल कार्पोरेट विभागात लागणार आहेत.

हा महोत्सव म्हणजे खवय्यासाठी मोठी पर्वणी होणार असून गावठी चिकन, मटण, पापलेट, सुरमई, कोलंबी, कोंबडी वडे, उकडहंडी, अळूवडी, माशांचे कालवण, बोंबलांची पोतेडी पोतेंडी आदी भिन्न विभिन्न पक्वाने या महोत्सवात खवय्यांना उपलब्ध होणार आहेत. तर शाकाहारी पदार्थाचे वेगळे स्टॉल ठेवण्यात आले असून विविध करमणुकीचे कार्यक्रम ऑर्केस्ट्रा स्थानिक मुलांचे तसेच समूह नृत्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -