घरठाणे८९४ थकबाकीदारांकडे ८० कोटी थकीत

८९४ थकबाकीदारांकडे ८० कोटी थकीत

Subscribe

कर विभागाने ५ हजार ११८ थकबाकी दारांना नोटिसा बजावल्या

एकीकडे महापालिका आयुक्तांनी मालमत्ता आणि पाणी पट्टी कर १०० टक्के वसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच आयुक्तांनी दोन लाखांवरील ठाकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा असे म्हटले असताना, आता कर विभागाने दोन लाखांवरील मालमत्ताधारकांची यादी तयार केली असून यामध्ये ८९४ जणांकडे तब्बल ८० कोटींनी थकबाकी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तसेच कर विभागाने ५ हजार ११८ थकबाकी दारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यातच, जप्ती टाळण्यासाठी थकबाकी दारांनी तातडीने थकीबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोना या महामारी आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका ठाणे महापलिकेच्या तिजोरीला बसला आहे. या प्रकारची गांभीर्याने दाखल घेत, महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व थकीत मालमत्ता व पाणी पट्टी कर वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याबाबतचे आदेश ठाणे महापलिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. यावेळी त्यांनी दोन लाखावरील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे कडक आदेश सर्व अधिका-यांना आणि विभागप्रमुखांना दिले.

- Advertisement -

त्यातच ठाणे महापलिका प्रशासनाकडून पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानुसार दोन लाखांवरील थकबाकीदारांची यादी तयार केली असून ८९४ मालमत्ता धारकांनी ७९ कोटी ७७ लाख ७७ हजार २०२ इतका कर थकला असल्याची बाब समोर आली आहे. त्यात मागील दोन महिन्यात दोन लाखांवरील व त्या खालील थकबाकीदार अशा ५ हजार ११८ थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीसा बजाविण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

आतापर्यंत ४९५.०७ कोटी वसुली
यावर्षी मालमत्ता विभागाला ७४० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून आजच्या घडीला ४९५.०७ कोटी मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली माजीवडा मानपाडा या प्रभागात झाली असून सर्वात कमी दिवा मधून झाली आहे.

- Advertisement -

प्रभाग निहाय वसुली
प्रभाग वसुली रक्कम
माजीवडा मानपाडा १३९.२८
वर्तकनगर ०७०.३६
नौपाडा कोपरी ०६९.१०
कळवा ०१९.९१
मुंब्रा ०२१.०४
दिवा ०१८.८१
वागळे इस्टेट ०२०.७६
लोकमान्य- सावरकर ०२०.१६
मुख्यालय ०८१.०५
एकूण ४९५.०७

८९४ थकबाकीदारांवर कारवाईची टांगती तलवार
दोन लाख ते ४ लाख ९९९ हजारांपर्यंत सर्वाधिक ५५६ थकबाकीदार आहे. तर ५ लाख ते ९ लाखा ९९९ हजारांपर्यंत १९४ असून दहा लाख आणि त्याहून अधिक असे १४४ थकबाकीदार असे एकूण ८९४ थकबाकीदार आहे. त्यांच्याकडून ७९ कोटी ७७ लाख ७७ हजार २०२ रुपये वसुली करायचे आहेत. जे हा कर भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ही राहणार आहे.

” दोन लाखांहून अधिक थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनीच दिले आहेत. त्यानुसार आता यादी तयार केली असून नोटिसाही बजावल्या आहेत. यापुढील जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत कर तातडीने भरून महापालिकेला सहकार्य करावे.”
– ज्ञानेश्वर ढेरे,उपायुक्त, कर विभाग, ठामपा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -