घरताज्या घडामोडीBMC Budget 2022 : मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि विकासाचे स्वप्न हरवलेला...

BMC Budget 2022 : मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि विकासाचे स्वप्न हरवलेला अर्थसंकल्प – प्रविण दरेकर

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची फसवणूक करणारा, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा, मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि मुंबईच्या विकासाचे स्वप्न हरवलेला अर्थसंकल्प आहे. महापालिकेने त्या त्या विभागावर केलेल्या तरतुदी अत्यंत तोकड्या आहेत. मुंबईच्या विविध विकास प्रकल्पांवर केलेली तरतूदही अत्यंत तोकडी आहे. जे करायला पाहिजे ते केलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे. अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

मुंबई महापलिकेच्या अर्थसंकल्पावर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, मराठी भाषा भवनासाठी काही तरतूद अर्थसंकल्पात दिसत नाही. ते कधी उभे राहणार माहीत नाही. मराठी शाळा बंद होत असताना महापालिकेला पब्लिक स्कूल हव्या आहेत. परंतु मराठी शाळांचे काय? उर्दू भाषा भवनला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. वन रूपी क्लिनिकची घोषणा केली होती, त्या घोषणेचे काय झाले? शिवआरोग्य केंद्र जवळपास ३०० उभी करणार आणि त्याकरता ३० कोटींची तरतूद अत्यंत तोकडी आहे असेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ केलाय, पण ५०० फुटांच्यावरही राहणा-या सर्वसामान्यांच्या घरांसाठी कर माफ केलेला नाही. आरोग्य सेवांसाठी ४७६० कोटींची तरतूद आहे. एवढ्या मोठ्या मुंबई शहरात ही अत्यंत तोकडी तरतूद आहे. ७५० कोटींची बेस्ट उपक्रमासाठीची तरतूदहीही अत्यंत तोकडी आहे. एका बाजूला महसूली तूट होत आहे. उत्पन्नवाढीची कोणतीही ठोस उपाययोजना नाही. उलटपक्षी विविध सेवा आणि छाननी शुल्कात वाढ करून मुंबईकरांवरील कराचा बोजा वाढवलेला आहे अशी टिकाही दरकेर यांनी केली.

कोस्टल रोडसाठी केलेली तरतूद तोकडी आहे. त्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मिठी नदी असेल अथवा अन्य जी मोठ मोठी स्वप्ने मुंबई महापालिकेतील सत्ताधा-यांनी दाखवली आहेत, त्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा हा अर्थसंकल्प आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा : BMC Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि विकासाभिमुख – किशोरी पेडणेकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -