घरट्रेंडिंगयंत्रांची कमाल! ५ मजल्यांची अखंड इमारत केली शिफ्ट!

यंत्रांची कमाल! ५ मजल्यांची अखंड इमारत केली शिफ्ट!

Subscribe

तुम्ही कधी इमारत चालताना पाहिली आहे का? चीनच्या इंजिनिअर लोकांनी हे शक्य केलं आहे. दरम्यान चीनच्या शांघायमध्ये १९३५ सालच्या ७६०० टन असलेल्या लागेना प्राथमिक विद्यालयाची पाच मजली इमारती मूळ जागेवरुन हलवून दुसऱ्या जागेवर नेली आहे. यासाठी पहिल्या इमारतीला जॅकच्या मदतीने उचलले आणि रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापर करून इमारतीला दुसऱ्या जागेवर शिफ्ट केले गेले.

माहितीनुसार, या जुन्या इमारतीजवळ एक नव्या प्रोजेक्टला सुरुवात करायची होती. यासाठी जागा कमी पडत असल्यामुळे इमारतीला दुसऱ्या जागेवर हलवण्याचा निर्णय घेतला. बघायला गेले तर इंजिनिअर लोकांकडे इमारत पाडण्याचा पर्याय होता. पण त्यांनी इमारतीला मूळ जागेवरून हलवून दुसऱ्या जागी शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काँक्रीटपासून तयार केलेली ही भर-भक्कम इमारत इंजिनिअरच्या एका टीमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने उचलली गेली आणि १९८ रोबोटच्या साहाय्याने इमारतीच्या मूळ जागेवरून जवळपास ६२ मीटर दूर हलवण्यात आली. याकामासाठी १८ दिवस लागले. आता प्रशासनाने या ऐतिहासिक इमारतीचे सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान इमारतीला हलवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि चीनने अनेक वर्षापासून हा प्रयत्न करत होता. परंतु यावेळेस चिनी इंजिनिअर लोकांना रोबोटच्या पायाच्या साहाय्याचा वापर करून इमारती मूळ जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यात यश आले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – व्हिलचेअरवर भीक मागणाऱ्या नफीसाच्या बँक खात्यात मिळाले कोट्यवधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -