घरट्रेंडिंगनशीब असावे तर असे! टाईमपाससाठी खेळला लॉटरी अन् झाला करोडपती

नशीब असावे तर असे! टाईमपाससाठी खेळला लॉटरी अन् झाला करोडपती

Subscribe

कोणीतरी म्हटलेय ना, कोणाचं भाग्य केव्हा उजळेल काही सांगता येत नाही. हौस आणि मज्जा मस्तीसाठी केलेल्या गोष्टी देखील तुम्हाला करोडपती बनवू शकतात. कारण अशीच घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे. अनेकदा आपले नशीब आजमवण्यासाठी काही जणं लॉटरीचे तिकिट खरेदी करतात. यात काहींना नशीबाने लॉटरी लागते तर काहींना नाही. अलीकडेच अमेरिकेतील मेरीलँडमधील एक व्यक्ती इतकी भाग्यवान ठरली की, टाईमपासून खरेदी केलेले लॉटरीचे तिकिट त्याला रातोरात करोडपती बनवून गेले. त्यामुळे जगभरात या व्यक्तींच्या भाग्याचा गवगवा केला जात आहे. मेरीलँडमधील या व्यक्तीने दुसऱ्यांदा खरेदी केलेल्या स्क्रॅच ऑफ लॉटरी तिकिटमधून २ मिलियन डॉलर म्हणजे १४ कोटी ९५ लाख ४४ हजार रुपयांचा जॅकपॉट जिंकला. त्यामुळे जगभरातील लोकांसाठी ही व्यक्ती चर्चेचे कारण बनली आहे. या व्यक्तीचे भवितव्य कसे बदलले ते जाणून घेऊया…

१४ कोटींची लॉटरी

तब्बल दुसऱ्यांदा लॉटरीमधून एवढी मोठी रक्कम जिंकणारा व्यक्ती ६५ वर्षांचा आहे. सॅलिस्बरीहून मेरीलँडला जाताना असताना तो टाईमपास म्हणून 2,000,000 डॉलर रिचर स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी करण्यासाठी सॅलिसबरी लॉटरी स्टेशनवर थांबला. यावेळी त्याने खरेदी केलेले लॉटरी तिकिट त्याला करोडपती बनवून गेले. यावर मेरीलँड लॉटरी अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीने सांगितले की, एवढा मोठा लॉटरी जॅकपॉट मिळेल अशी कधी अपेक्षाच केली नव्हती. या जॅकपॉटचा तो अव्वल विजेता ठरला आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीमुळे तिकीट खरेदीचा निर्णय

जॅकपॉट विजेत्याने सांगितले की, कोरोना महामारीमुळे त्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. या कारणास्तव त्यांने लॉटरीची तिकिटे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्याला १०० डॉलर लॉटरीचे तिकीट मिळाले. पण, त्यानंतर त्याला २ मिलियन डॉलरचे (२ मिलियन डॉलर लॉटरी तिकीट) तिकीट देखील मिळाले, ज्याची त्याने कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.

विजेत्याने सांगितले की, त्याने दुसरे लॉटरी तिकीट काही महिने असंच ठेवल होत. पण, आता त्याची एक्सपायरी डेट जवळ येत असल्याने त्याला भीती वाटू लागली की, कदाचित हे लॉटरीचे तिकिट खोटे निघाले तर…

- Advertisement -

पण, लॉटरीच्या तिकीटाची एक्सपायरी डेट संपण्याआधीच त्यांना लॉटरी जिंकल्याची माहिती मिळाली. या व्यक्तीने एक नाही तर तब्बल दोन लॉटरी तिकिटे जिंकली. लॉटरीची दोन तिकिटे जिंकल्यानंतर त्या व्यक्तीने प्रतिक्रिया देत सांगितले की ‘प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार लॉटरीचा खेळ खेळला पाहिजे. केवळ पैशासाठी नाही तर आनंदासाठी खेळला पाहिजे. माणूस जिंकतो किंवा हरतो, पण जीवनात आनंद मिळवणे सर्वात महत्त्वाचे असते. या जिंकलेल्या पैशातून कुटुंबासह फिरण्यासाठी मज्जा-मस्ती करण्यासाठी जाईन. तर उरलेल्या पैशातून माझे घर अधिकच सुंदर करेन, असं तो म्हणाला.


Cruise Drugs Case : ‘वडील म्हणून दिलासा मिळाला’ आर्यन खानच्या जामीनावर आर.माधवनची प्रतिक्रिया


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -