घरमहाराष्ट्रड्रग्ज, पॉर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्या काशिफ खानविरोधात कारवाई करण्यास वानखेडेंनी रोखलं; मलिकांचा आरोप

ड्रग्ज, पॉर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्या काशिफ खानविरोधात कारवाई करण्यास वानखेडेंनी रोखलं; मलिकांचा आरोप

Subscribe

काशिफ खानला अटक झाल्यास भाजपचं पितळ उघड होईल - नवाब मलिक

क्रूझ पार्टीमधील दाढीवाला काशिफ खान हा फॅशन टीव्हीचा भारतातील हेड आहे. देशभरात फॅशन शो करतो. त्या शोमध्ये ड्रग्जची विक्री होते. मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालवण्याचं काम करतो. मात्र, या काशिफ खानविरोधात कारवाई करण्यास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अनेकदा रोखलं, असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला.

क्रूझवर एका पार्टीचं काशिफ खान याने आयोजन केलं होतं. त्याने सर्व निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर टाकल्या आहेत. त्या दिवशी ती व्यक्ती क्रूझवर होती. रविवारी ६ वाजून २३ मिनिटांचा व्हिडिओ जो त्याच्याच साईटवरुन घेतला आहे. त्यात तो प्रेमिका सोबत नाचत असताना दिसत आहे. मी त्या दिवशी वानखेडे यांना विचारलं होतं की हा दाढीवाला कोण आहे? या दाढीवाल्याला अटक का केली नाही? हा दाढीवाला फॅशनच्या नावाखाली जगभरात पॉर्नोग्राफीचा धंदा करतो, ड्रग्जचा धंदा करतो, सेक्स रॅकेट चालवतो, समीर वानखेडे यांच्याशी चांगले संबंध आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

पुढे बोलताना नवाब मलिक यांनी सांगितलं की, एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की, अनेक वेळा काशिफ खानवर छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु समीर वानखेडे यांनी काशिफ खानविरोधात कारवाई करण्यासाठी अनेकवेळा रोखलं. तीन दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केला होता की प्रामाणिक अधिकारी काशिफ खानला का अटक करत नाही आहे? त्याच्या अटकेमुळे यांची ररहस्य उलगडणार आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. आम्हाला असं वाटतंय की हे दलदल आहे आणि यात जेवढं शोधण्याचं प्रयत्न करु तेवढी अधिक प्रकरणं समोर येतील, असं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं.

कालपासून बघतोय मला धमक्या देत आहेत. माझ्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करा, मी स्वत:च्या हिंमतीवर लढायला तयार आहे. परंतु आता सांगितलं जात आहे नवाब मलिक यांनी न्यायालयात जावं. न्यायालयात वानखेडे गेले आहेत. परवा एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली की, नवाब मलिक यांच्यावर सार्वजनिक पद्धतीने माध्यमांशी बोलण्यासाठी बंदी घालावी. ट्वीटरवर लिहिण्यास बंदी घालावी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी यावर निर्णय देताना सांगितलं की आता काही तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही आहे, सुट्टीनंतर यावर सुनावणी घेऊ. काय समजतो हा अधिकारी? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

नवाब मलिक महाराष्ट्राचा नागरिक

समीर वानखेडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की आम्ही मराठी लोकं आहोत, आम्हाला मदत करा. नवाब मलिक यांचं परिवार ७० वर्षांपासून या शहरात आहे. ५९ सालचा माझा जन्म आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचा नागरिक आहे. मग नवाब मलिक महाराष्ट्राचा नाही, मराठी नाही. पण काल सर्व भाजप यांच्यासोबत उभ राहिली. किरीट सोमय्या यांना वानखेडे यांचं कुटूंब भेटलं, त्यांच्यासोबतचे फओटो व्हायरल झाले, असं नावब मलिक यांनी सांगितलं.

मला जी शंका होती की जो जीन आहे त्याचा जीव याच पोपटात आहे, आणि पोपट पिंजऱ्यात बंद होणार आहे म्हणून पूर्ण जीन, जे राक्षसी विचाराचे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत. कुठेना कुठे तरी जीन घाबरला आहे. कारण, पोपट तुरुंगात गेला तर अजून रहस्य उलगडतील, असं नवाब मलिक म्हणाले.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र

महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकाराला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे. ही केस रिया चक्रवर्ती पासून सुरु झाली, समीर वानखेडेंनी गुन्हे दाखल केले, बॉलिवूडवाल्यांचा रांगा लागल्या, एकालाही अटक झाली नाही. जर केसमध्ये काही असेल तर कारवाई होते. पण काहीच झालं नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपकडून षडयंत्र रचलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबईला, महाराष्ट्र सरकारला, बॉलिवूडला बदनाम केलं जात आहे. कारण योगी आदित्यनाथ यांना नोएडामध्ये फिल्म सिटी बनवायची आहे. ताज महल हॉटेलमध्ये भाजपला ज्यांचं समर्थन आहे, ते लोक त्यांना भेटले. त्यांना हे वाटतंय की, बॉलिवूडला बदनाम केलं तर हे बॉलिवूड मुंबईच्या बाहेर जाईल, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजप नेत्यांचे राईट हँड एनसीबी कार्यालयात जातात

भाजपचे मोठे मोठे नेते त्यांच्या जवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात, तिथे अधिकाऱ्यांना भेटतात. मी जाबाबदारीने सांगतो की भाजपच्या काही नेत्यांचे राईट हँड समीर वानखेडे यांना भेटतात. कालपासून त्या हालचाली वाढल्या आहेत, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -