घरट्रेंडिंगModi Vs Thackeray : आता ठाकरे गॅरंटी! जुमलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख; शिवसेना ठाकरे...

Modi Vs Thackeray : आता ठाकरे गॅरंटी! जुमलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख; शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटची चर्चा

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियाच्या विविध प्लॅट फॉर्मवरुन विरोधकांवर हल्लाबोल केला जातो. त्यासोबत केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली जाते. आता विरोधी गटाकडूनही समाज माध्यमांचा वापर होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने आता महाराष्ट्रात आणि देशात एकच गॅरंटी चालणार, ती म्हणजे ठाकरे गॅरंटी असे ट्वीट करुन मोदी गॅरंटीला आव्हान दिले आहे.

कोरोना काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील जनतेसोबत संवाद साधत होते. जनतेसोबत कुटुंबसंवाद करुन मार्गदर्शन करत होते, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या, थाळ्या वाजवून जनतेचं मूळ प्रश्नावरुन लक्ष विचलीत करत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. जमुलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची तुलना करणारे ट्वीट शिवसेना ठाकरे गटाने केले आहे. त्यासोबतच मोदींच्या गॅरंटीलाही आव्हान देत आता चालणार ठाकरे गॅरंटी असेही म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे ट्वीटमध्ये

शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जुमलेबाज विरुद्ध कुटुंब प्रमुख असे ट्वीट करण्यात आले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींचा तोंड लपवतानाचा फोटो वापरण्यात आला आहे. त्याखाली ठळक अक्षरात जुमलेबाज लिहिले आहे.
कोरोनाकाळात टाळ्या थाळ्या वाजवून जनतेचं मूळ प्रश्नावरुन लक्ष विचलित केल्या आरोप ठाकरे गटाने केला आहे.
दुसरा आरोप केला आहे की मृतांची आकडेवारी लपवून मोदींनी राजकीय पोळी भाजली.
शेतकरी आंदोलनावरुन तिसऱ्या मुद्यातून मोदींना घेरले आहे.
आणि चौथा मुद्दा हा संकटकाळात महाराष्ट्राकडे, तौक्ते वादळातील पीडितांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : Congress Vs VBA : काँग्रेसची दहावी यादी; अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात यांना दिली उमेदवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -