घरट्रेंडिंगDigital Payment वापरून LPG गॅस सिलेंडरवर मिळवा १०० रुपयांची सूट!

Digital Payment वापरून LPG गॅस सिलेंडरवर मिळवा १०० रुपयांची सूट!

Subscribe

जाणून घ्या, LPG गॅस सिलेंडर बुक करताना कशी सवलत मिळवू शकता

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. मागील दोन महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात साधारण १२५ रुपयांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. या सतत वाढणाऱ्या किंमतीत काहिशी सूट मिळावी, यासाठी ग्राहक प्रयत्नात असतात. तुम्हाला देखील एलपीजी गॅस सिलेंडर बुक करताना सवलत हवी असेल तर डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशनचा वापर करा. ही सवलत मिळण्यासाठी तुम्ही पेटीएम (Paytm) या डिजिटल पेमेंट अॅप्सचा वापर करून १०० रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात.

पेटीएमकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम या डिजिटल पेमेंट अॅप्सचा वापर करून पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांना १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकांनी पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर एक स्क्रॅचकार्ड ग्राहकांना दिलं जाईल, ते स्क्रॅच केल्यानंतर ग्राहकांना किती कॅशबॅक मिळाला आहे याची माहिती त्यांना तेथे समजणार आहे. हा कॅशबॅक १०० रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे तो या किंमतीपेक्षा कमी देखील असू शकतो. या ऑफरचा फायदा ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत घेता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

Amazon वर मिळणार ५० रुपयांपर्यंचा कॅशबॅक

ग्राहकांनी इंडेनचा एलपीजी गॅस सिलेंडर Amazon वरुन बुक केला तर त्यांना ५० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याकरता ग्राहकांना अॅमॅझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट करावं आवश्यक असणार आहे. यानंतर कॅशबॅक ग्राहकांच्या वॉलेटमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे माहिती इंडियन ऑइलने ट्वीट करून दिली आहे.

- Advertisement -

अशा आहेत अटी व शर्ती

  • जे ग्राहक पहिल्यांदा पेटीएमवरून सिलेंडर बुक करतील त्यांनाच हा फायदा मिळणार
  • या आधी पेटीएमवरून बुकिंग केले असल्यास एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणतीही सवलत मिळणार नाही
  • ग्राहकांना या सवलतीचा लाभ ३१ मार्चपर्यंतच मिळू शकणार आहे
  • पेमेंट केल्यानंतर जे स्क्रॅचकार्ड मिळेल ते ७ दिवसांत स्क्रॅच करणं अनिवार्य
  • स्क्रॅच केल्यानंतर जी रक्कम असेल ती ग्राहकांना कॅशबॅक स्वरुपात मिळणार

 

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -