घरटेक-वेकGoogle Doodle म्हणजे नेमकं काय ? गुगलचे डूडल नेहमीच चर्चेत का असतात?

Google Doodle म्हणजे नेमकं काय ? गुगलचे डूडल नेहमीच चर्चेत का असतात?

Subscribe

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर किंवा माहिती शोधण्यासाठी आपण क्षणाचाही वेळ न दवडता गुगल करतो. सोशल मीडिया जगतातील प्रसिद्ध सर्च इंजिन म्हणून गुगलकडे पाहिले जाते. मात्र या गुगलकडून युजर्सला केवळ माहिती न देता त्यांचे  मनोरंजन करण्यासाठी काही खास दिवशी गेमिंग किंवा नॉर्मल डूडल शेअर केले जाते. यातून एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच आज आंतरराष्ट्रीय पिझ्झा डेनिमित्ताने गुगलने एक युनिक डूडल शेअर केलयं. या डूडलची आत्ता सर्वाधिक चर्चा होतेय. गुगलचे हे डूडल समजायला साधे सोप्पे आणि खूपचं आकर्षित असतात. परंतु गुगलचे हे डूडल नेमक काय आहे? आणि आत्तापर्यंत सर्वाधिक हिट ठरलेले डूडलबद्दल जाणून घेऊ…

पहिल्यांदा गुगल डूडल नेमकं काय आहे ते समजून घेऊ, गुगल काही खास दिवशी आपल्या अधिकृत लोगोच्या जागी अॅनिमेटेड फोटो आणि होवर टेक्स्ट ठेवतो. त्यालाच गुगल डूडल असे म्हणतात. गुगल हे खास डूडल सुट्टी, कार्यक्रम, विशिष्ठ देशाची किंवा व्यक्तीची उल्लेखनीय कामगिरी, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व साजरा करण्याच्या उद्देशाने हे डूडल तयार करते. हे डूडल गुगलच्या फ्रंट पेजवरील गुगल लोगोच्या जागी काही वेळेपूर्ते ठेवले जाते. म्हणजेच एका खास दिवशीनिमित्त ठेवले जाते.

- Advertisement -

गुगलने सर्वात पहिले डूडल नेवाडा येथील ब्लॅक रॉक सिटीमधील वार्षिक बर्निंग मॅन कार्यक्रमाच्या १९९८ आवृत्तीचा गौरव करण्याकरिता तयार केले होते. या डूडल बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना डूडलर्स म्हणतात. आत्तापर्यंत या डूडलर्सनी ४००० हून अधिक डूडल बनवले आहेत.

अशातच गुगलने आज जगभरातील सर्वात पॉप्युलर फूड पिझ्झा डेनिमित्त एक खास डूडल ठेवले आहे. गुगलचे हे डूडल देखील रोजच्यापेक्षा खूपचं युनिक आहे. या डूडलमध्ये गुगलने युजर्ससाठी एक पिझ्झा कटिंगचा गेम दिला आहे. ज्यामध्ये एक कोडं दिलं असून युजर्सला पिझ्झा कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे त्या पिझ्झाचे तुकडे करायचे आहेत. या डूडलमध्ये जगभरातील प्रसिद्ध ११ पिझ्झा टॉपिंगला समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी देखील गुगलचे काही डूडल अधिक लोकप्रिय ठरले. यात चीनच्या प्रसिद्ध ड्रॅगन बोट फेस्टिव्हलनिमित्त तयार करण्यात आलेल्या डूडलचे यात नाव घेतले जाते. या डूडलमध्ये चीनच्या ड्रॅगन फेस्टिव्हलमधील आकर्षणाचा भाग असलेली बोट आणि या फेस्टिव्हल निमित्त खाल्ला जाणारा चीनी पदार्थ डंपलिंग्ज बोटातील नावाडी म्हणून दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोना काळातही गुगलने २०१७ मध्ये सुपरहिट झालेली डूडलची एक जुनी इंटरॅक्टिव डूडल गेम्स सिरीज डूडलमधून दाखवली होती. मात्र गुगलकडून ही गेम्स सिरीज अधिक खास करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात गुगलने काही सर्वात लोकप्रिय खेळ डूडलमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. ही गेम सिरीज लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत अनेकांसाठी खास ठरली.

याचदरम्यान जगभरातील युजर्सला कोरोनापासून दूर राहण्यासाठी देखील गुगलने एक स्पेशल डूडल तयार केले होते. या डूडलमध्ये गुगलचे सर्व लेटर्स एकमेकांपासून वेगळे दाखवण्यात आले होते. हे प्रत्येक लेटर्स कुठे बुक वाचताना, म्युजिक वाजवताना किंवा इतर एक्सरसाईज करताना दाखवण्यात आले होते.

तर ८ मार्च महिला दिनानिमित्तचे औचित्य साधत गुगलने तयार केले एक विशेष डूडल चर्चेत राहिले होते. गुगलच्या या डूडलमध्ये महिलांचा सन्मान करत १३ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायी कोट्स लिहिले होते. यातच गुडलचे मदर्स डे स्पेशल, अॅनिर्व्हसरी ऑफ हिप हॉप, गुगल बर्थडे असे अनेक डूडल लोकप्रिय ठरले.

गुगल डूडलमधील कोडिंग रॅबिट, बेसबॉल, पेक मॅन, क्विक ड्रॉ, हॉल्वोन असे काही गेम्सही लोकप्रिय ठरले आहेत.

गुगल या डूडलच्या माध्यमातून युजर्सचे काही वेळ का होईना मनोरंजनासोबत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे गुगल डूडलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समधून नक्की कळवा आणि आमच्या मायमहानगरला भेट द्यायला विसरु नका.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -