घरताज्या घडामोडीBig Boss 15 : देवालीना-रितेशला एकत्र पाहून राखी सावंतचा नवा ड्रामा ;...

Big Boss 15 : देवालीना-रितेशला एकत्र पाहून राखी सावंतचा नवा ड्रामा ; म्हणाली – ‘तू माझ्यासाठी कोणीच नाही’

Subscribe

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने बिग बॉसमध्ये तिचा नवरा रितेश सोबत प्रवेश केल्यापासून काहीना काही नवा ड्रामा सुरुच आहे.राखी सावंतने तिचे लग्न झाले असून, तिच्या पतीचे नाव रितेश असल्याचे सांगितले. मात्र, आजपर्यंत तिने पतीला कधीही कॅमेरासमोर आणले नव्हते.खरंतर प्रेक्षकांचा अजूनही तो तिचा पती असल्याचा विश्वास बसत नाही आहे.यावरुन सोशल मिडियावर राखीला ट्रोल केले जात आहे.तसेच राखी आणि रितेशमध्ये ज्याप्रमाणे दुरावा निर्माण झाला आहे, ते पाहता लोकांना त्या दोघांचे नाते खोटे वाटतं आहे.

आता नुकताच बिग बॉसच्या घरात असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये राखी आणि रितेश देवोलीनावरून भांडत असल्याचे पाहायला मिळतं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रितेश आणि देवोलिना सोबत बसले आहेत, यादरम्यान अभिनेत्री देवोलिना भूतकाळातील काही आठवणी आठवून रडायला सुरुवात करते. राखी दोघांना बोलताना पाहून भडकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

राखी रितेशला म्हणाली,  “तिचे बोलणे ऐकून तू भावनिक का झालास?” रितेश म्हणतो, “ती रडत होती ते पाहून मला वाईट वाटले”. रितेशचे म्हणणे ऐकून राखी म्हणाली, “या लोकांवर आंधळा विश्वास ठेवू नकाे, हे लोक तुझा फायदा घेतील आणि फसवतील मग तू माझ्याकडेच येशील.” तिचे हे म्हणणे ऐकून रितेशने उत्तर दिले की, “तो खेळासाठी स्वतःला बदलू शकत नाही.” यानंतर राखी आणि रितेशमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि राखी सावंत रागाने म्हणाली “तू माझ्यासाठी कोणी नाही”.

- Advertisement -

 


हे ही वाचा – ICC Test Rankings : भारत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर; न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -