घरUncategorizedमौखिक आरोग्याबाबत डॉक्टर्सनी केली जनजागृती

मौखिक आरोग्याबाबत डॉक्टर्सनी केली जनजागृती

Subscribe

'राष्ट्रीय मौखिक स्वच्छता दिना'निमित्त शासकीय दंत महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाचे आणि शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी सीएसएमटी स्थानकावर तंबाखूपासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबत प्रवाशांना माहिती दिली.

कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे हे माहित असूनही अनेक जण तंबाखू, गुटखा, खर्रा अशा अनेक तोंड आणि परिणामी शरीराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांचं सेवन करतात. त्यातून होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. हे प्रमाण कमी व्हावं, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

मौखिक आरोग्य स्वच्छ नाही राखलं तर संपूर्ण शरीराला हानी पोहचू शकते, याचंच गांभीर्य पटवून देण्यासाठी १ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय मौखिक स्वच्छता दिना’निमित्त शासकीय दंत महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाचे आणि शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी सीएसएमटी स्थानकावर तंबाखूपासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबत प्रवाशांना माहिती दिली. ‘राष्ट्रीय मौखिक स्वच्छता दिना’निमित्त या जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

- Advertisement -

डॉ. जी. बी.शंकवालकर यांच्या जन्मदिनानिमित्त

या जनजागृती कार्यक्रमात तंबाखूजन्य पदार्थ खाणं किती आणि कसं जीवावर बेतू शकतं? याचं मार्गदर्शन करण्यात आलं. शिवाय, डॉक्टरांनी सीएसएमटी स्थानकात पथनाट्य सादर करत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंडियन सोसायटी ऑफ पेरिओडोन्टोलॉजीचे संस्थापक डॉ. जी. बी.शंकवालकर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात.

डॉक्टरांची 'रॅप'मधून मौखिक आरोग्याची जनजागृती

डॉक्टरांची 'रॅप'मधून मौखिक आरोग्याची जनजागृती

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 1, 2019

- Advertisement -

‘राष्ट्रीय मौखिक दिना’निमित्त जनजागृतीचा उपक्रम

याविषयी अधिक माहिती देताना शायकीय दंत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि पेरिओडोन्टोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले की, “सध्या हिरडी आणि दातांच्या समस्यांचं प्रमाण ९४ टक्के एवढे आहे. हिरडीतून पू येणं, रक्त येणं, त्यातून वास येणं अशा समस्या लोकांना भेडसावतात. तर, दातांना किड लागण्याच्या समस्या ही साधारणत: पाहायला मिळतात. खरंतर लोकं याकडे दुर्लक्ष करतात. ‘राष्ट्रीय मौखिक दिना’निमित्त जनजागृतीचा उपक्रम राबवला. १२ वर्षांवरील प्रत्येकाला दातांच्या समस्या आहेत. त्यामुळे तोडांचं आरोग्य राखणं गरजेचं आहे. तरच शरीर सुदृढ राहिल.”

१२ वर्षांवरील प्रत्येकाला दातांची समस्या

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, १२ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला १०० टक्के दातांची समस्या आहे. तर, ६० ते ९० टक्के शाळेत जाणाऱ्या मुलांना दातांच्या समस्या आहे. ६५ ते ७४ वयोगटातील लोकांना ३० टक्के नैसर्गिक दातच नसतात. यावर उपाय म्हणून फ्लोराईड टूथपेस्टच्या वापरामुळे कॅव्हिटी होण्याच्या समस्येतून मुक्तता होऊ शकते. शिवाय खाण्यात साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तोंडाची स्वच्छता राखली तर तोंडांत होणाऱ्या संसर्गापासून वाचण्यासाठी मदत होईल. दर सहा महिन्यांनी किमान एकदा दातांच्या डॉक्टरांची भेट घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर्स देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -