घरव्हिडिओऑनलाईन रम्मी फसवणुकीबाबत पोलीस उपायुक्तांचे आवाहन

ऑनलाईन रम्मी फसवणुकीबाबत पोलीस उपायुक्तांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

ऑनलाइन रम्मीमध्ये तब्बल १० लाख ६७ हजार १३८ रूपये हरल्यानंतर ते लपवण्यासाठी मुलाने नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देत हायटेक चोरट्यानेच वडिलांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचाच बनाव त्याच्या अंगलट आला. विशेष म्हणजे, घर खरेदीसाठी जमवलेले पैसे मुलाने जुगारात उधळल्याने वडिलांना हदृयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑनलाईन रम्मीमध्ये होणाऱ्या फसवणुकीबाबत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी लोकांना अशा खेळाच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी आपलं महानगरने आढावा घेतला आहे.

- Advertisement -