पुणे : लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाची आत्महत्या

पुण्यात लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

suicide
आत्महत्या

पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप डेकोरेटरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा पुण्यात लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. धायरी परिसरातील राज याने हॉटेलमध्ये गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. सकाळी साधारण ९ वाजण्याच्या सुमारास राज शेट्टी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; धायरी परिसरात शेट्टी यांचे हॉटेल होते. त्यांनी भाड्याने हॉटेल घेतले होते आणि ते या हॉटेलचे मॅनेजर होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक संकट आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सकाळी हॉटेलमध्ये ९ वाजताच्या दरम्यान शेट्टी यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, शेट्टी यांनी प्राथमिक अंदाजानुसार, मानसिक नैराश्य आणि लॉकडाऊनमुळे आलेला तणाव यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राज्यात २४ तासांत ३ हजार ६६१ जणांना मिळाला डिस्चार्ज

राज्यात आज ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ७७ हजार ४५३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दोन दिवसापासून राज्यातून दिलासादायक माहिती समोर येत असून कालदेखील ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा आकडा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये ९४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह