घरव्हिडिओनाशिकच्या घोटी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

नाशिकच्या घोटी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

Related Story

- Advertisement -

इगतपरी तालुक्यातील घोटी ग्रामपालिकेला घोटी गावातील कचरा फेकण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. याबाबतीत घोटी प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी आजूबाजूच्या परिसरात मोकळी जागा नसल्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील एका खासगी जागेत हा कचरा फेकला जात असल्याचे सांगितले. परंतू यामुळे घोटी गावातील नागरिकांना मोठ्या आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागणार आहेत. या कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता एका मोकळ्या जागेमध्ये फेकला जातो. त्यामुळे घोटी करांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर घोटीतील नागरिकांना मोठ्या आरोग्य विषयी समस्येला तोंड द्यावे लागेल. आपलं महानगरच्या विकास काजळे या प्रतिनिधीने येथील भयाण वास्तव मांडले आहे.

- Advertisement -