घरCORONA UPDATEधनंजय मुंडेंना कोरोनाची लक्षणं नाहीत, श्वसनाच्या त्रासासाठी रुग्णालयात जाणार!

धनंजय मुंडेंना कोरोनाची लक्षणं नाहीत, श्वसनाच्या त्रासासाठी रुग्णालयात जाणार!

Subscribe

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या कर्मचारी वर्गातल्या एकूण ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, धनंजय मुंडेंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असले, तरी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नसून श्वसनाचा त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंडेंचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, मात्र दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं. धनंजय मुंडेंसोबत त्यांच्या गाडीचा चालक आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली. ‘मुंडेंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्यामध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणं दिसत नसून फक्त श्वसनाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं आहे. धनंजय मुंडे फायटर आहेत. ते लवकर बरे होतील आणि कामकाजात पुन्हा सक्रीय होतील’, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. त्यासोबतच धनंजय मुंडेंनी या काळात उपस्थिती लावलेल्या कार्यक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. ‘मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. पण आम्ही अशा बैठका करतो, तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देखील फक्त ५ लोकं उपस्थित होते. पाच मिनिटांत तो कार्यक्रम संपला’, असं टोपे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी कोणते नियम पाळले जातात, याविषयी देखील त्यांनी सांगितलं. ‘ICMR च्याच गाईडलाईन्सप्रमाणे लक्षणं नसतील, तर कोणत्याही व्यक्तीची चाचणी केली जात नाही’, असं त्यांनी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -