घरव्हिडिओमराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर अनेक स्तरातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरण्यात आले. आजही याचे पडसाद मंत्रालयासमोर पाहिला मिळणार होत. मात्र, आंदोलन सुरु होण्यापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते. परंतु, आंदोलन करण्या अगोदरच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. हे आंदोलक औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -