घरव्हिडिओमुंबईत पाऊस लवकरच पडण्याचे संकेत

मुंबईत पाऊस लवकरच पडण्याचे संकेत

Related Story

- Advertisement -

प्लांट अँड ऍनिमल वेल्फेयर सोसायटी – मुंबई आणि अम्मा केअर फाऊंडेशनचे स्वयंसेवक निशा कुंजू, हसमुख वळंजू, आणि हितेश यादव यांनी मुंबई महालक्ष्मी, पेडर रोड, भांडुप आणि ठाणे, लोक लोकमान्य नगर नं. ४ येथून चार परदेशी चातक पक्षी उष्माघातामुळे मानवी वस्तीमध्ये सापडले. याची माहिती जागरुक नागरिकांनी पॉज-मुंबई व एसीएफच्या मदत क्रमांकावर दिली. चारही पक्ष्यांना पशु चिकित्सक डॉ. राहुल मेश्राम यांनी तपासणी करून सदर उपचार देण्यात आले व त्यांना काही वेळ देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते पक्षी सुदृढ असून चारही पक्ष्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक आणि पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी माहिती दिली. पक्षीतज्ज्ञ संजय मोंगा यांनी सांगितले की, चातक पक्षी हे परदेशी साऊथ आफ्रिका येथून १५ ते ३० मे च्या दरम्यान प्रवास करत भारतात स्थलांतर होतात. हे पक्षी स्वतः आपली घरटी तयार करत नाही, तर हे पक्षी इतरांच्या घरट्यामध्ये आपल्या अंडी देतात.

- Advertisement -