घरदेश-विदेशTikTok चं वेड; व्हिडिओच्या नादात फास लागून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

TikTok चं वेड; व्हिडिओच्या नादात फास लागून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Subscribe

निष्पाप व्यक्तीच्या टिकटॉकच्या नादात मृत्यू

राजस्थानच्या दौसा येथून एक दुखःद घटना समोर आली आहे. जिथे एक व्हिडिओ बनवताना निष्पाप व्यक्तीच्या टिकटॉकच्या नादात मृत्यू झाला. दौसाच्या दारवाजा पाडा परिसरातील अल्पवयीन व्यक्तीला टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्याची आवड होती असून तो विविध स्टंट करून व्हिडिओ बनवत होता. गुरुवारी रात्रीदेखील तो खोलीत पंख्याला लटकवून व्हिडिओ बनवणार होता. दरम्यान, त्याचा पाय घसरला आणि गळ्याला फास लागून त्याचा मृत्यू झाला.

१५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात नेला. नंतर अल्पवयीन मुलाचे पोस्टमार्टम करण्यात आले. या प्रकरणात, कुटुंबाने असे सांगितले की, मुलाला टिकटॉक बनवण्याचे वेड होते आणि टिकटॉक बनवताना हा अपघात झाला. कोतवाली पोलिस ठाणे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

- Advertisement -

टिकटॉक करताना गेला जीव

दौसा कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी राजेश मीना यांनी सांगितले की, दरवाजा पाडा परिसरात अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले होते


TikTok बनवणे पडले महागात; वाराणसीत पाच तरुण बुडाले

जेव्हा कुटुंबातील सदस्यांकडे विचारपूस केली असता, असे लक्षात आले की मुलाला सतत टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्याचे वेड होते. तो हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायचा. शुक्रवारी रात्री तो खोलीत लटकून व्हिडिओ बनवत होता. यावेळी हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -