घरविधानसभा २०१९ठाणे जिल्ह्यात 'सी - व्हिजील' अ‍ॅपवर १०७ तक्रारी

ठाणे जिल्ह्यात ‘सी – व्हिजील’ अ‍ॅपवर १०७ तक्रारी

Subscribe

ठाणे जिल्ह्यात 'सी व्हिजील' अॅपच्या माध्यामातून मागील १५ दिवसात १०७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ५१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘सी व्हिजील’ अॅपच्या माध्यामातून मागील १५ दिवसात १०७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ५१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ५३ तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ५७ तक्रारी या एकट्या मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रातील असल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करण्यासाठी हायटेक टेकनोलॉजिचा वापर करीत आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सी व्हिजील’ या मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अ‍ॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदवित आहेत.

- Advertisement -

अशी करा तक्रार

एखाद्या परिसरात पोस्टर, बॅनर किंवा एखाद्याकडून आचारसंहिता भंग होत असल्यास त्याचे छायाचित्र काढून ते छायाचित्र सी – व्हिजील अ‍ॅपवर पाठवायचे आहे. छायाचित्र पाठवताना ते नेमके कोणत्या भागातील आहे? याचा उल्लेख करण्यात यावा, हे अभिप्रेत आहे. तसेच आचारसंहिता भंगाचा तपशील कमीतकमी शब्दांत लिहून अ‍ॅपवर पाठवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

१०० मिनिटांत होते तक्रारीवर कारवाई

या अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर ही तक्रार ज्या भागातून आली आहे, त्या भागातील निवडणूक विभागातील पथकाद्वारे फ्लाइंग स्क्वॉडकडे पाठवली जाते. त्यानंतर, पुढील १५ मिनिटांत फ्लाइंग स्क्वॉड घटनास्थळी धाव घेते. त्यानंतर, त्यावर योग्य ती कारवाई झाल्यावर त्याची माहिती ही ४५ मिनिटांमध्ये मुख्य निवडणूक विभागाला दिली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – आचारसंहिता कालावधीत ४३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -