घरमुंबईभिवंडीत दोन गटामध्ये राडा; पोलिसांमुळे टळली हिंसक घटना

भिवंडीत दोन गटामध्ये राडा; पोलिसांमुळे टळली हिंसक घटना

Subscribe

भिवंडीत दुचाकीला कारची धडक लागल्यामुळे दोन गटामध्ये हाणामारीची घटना घडली. यामुळे भिवंडी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवरात्रोत्सवातील गरबा खेळून घरी निघालेल्या बहीण भावाच्या दुचाकीला ठाणे शहरातील आनंद दिघे चौक येथील हॉटेल समोर एका भरधाव कारची धडक लागली. यामुळे झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या हाणामारीत युवकांचा सहभाग असल्याने हिंसक वळण लागण्याची वेळ आली होती. मात्र, घटनास्थळी भिवंडी शहर पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दोन्ही गटांच्या युवकांना पिटाळून लावल्याने होणारी मोठी हिंसक घटना टळली आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ५ ते ६ अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. घटनास्थळी भाजप आमदार महेश चौघुले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष शोऐब गुड्डू यांनी उपस्थित राहून दोन्हीं समाजाच्या तरुणांची समजूत काढून वातावरण शांत केले.

नक्की वाचामुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगतची दारू भट्टी उद्ध्वस्त

- Advertisement -

शहरातील विविध भागामध्ये नवरात्रोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात महिलांसह युवक-युवती गरबा पाहण्यासाठी गर्दी करतात. अनेक मोटार सायकलस्वार वाहतुकीचे नियम तोडून बेफामपणे गाड्या चालवून पादचाऱ्यांना त्रास देत आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत.

नेमके काय झाले?

काल रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दिवेश श्याम खारेकर हा आपली चुलत बहिण जागृती खारेकर हिच्यासह अशोक नगर येथून गरबा खेळून मोटार सायकलवरून घरी चालला होता. त्यावेळी रिजेंट हॉटेल जवळ एका भरधाव कारची त्यांच्या मोटार सायकला धडक लागली. त्याचा जाब जागृती हिने कार चालकाला विचारला. त्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी होऊन एकमेकांवर हात उचलण्यात आला. त्यामुळे दिवेश याने चुलत भाऊ आणि मामे बहिणीला बोलावले. ते दोघे त्या ठिकाणी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी ठाणगे आळी, काप आळी आणि निजामपूरा परिसर असे दोन्हींकडील गट एकमेकांसमोर उभे राहिल्याने मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. त्यामुळे कारचालक घटनास्थळाहून निघून देखील गेला.

- Advertisement -

हेही वाचाधावत्या एक्स्प्रेसमधून बाटली भिरकावल्याने रेल्वे कर्मचारी जखमी

…त्यामुळे मोठा अनर्थ टळला

मात्र त्यानंतर दोन्ही गटाचे लोक एकत्रित जमा झाल्याने मोठा राडा झाला होता. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बळाचा वापर करीत दोन्ही गटांना बाजूला केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेप्रकरणी दिवेश खारेकर याने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ५ ते ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) मनिष पाटील करीत आहेत.

हेही वाचाअल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन वर्षाचा कारावास

ज्येष्ठ नागरिक संघाने केली ‘ही’ मागणी

भिवंडी शहरात सद्या विधासभा निवडणूकीची मोठी रणधुमाळी सुरू आहे. त्यासोबतच नवरात्रोत्सव देखील सुरू आहे. त्यामुळे महिलांसह नागरिक मोठ्या प्रमाणात रात्रीच्यावेळी रत्यावर येत असल्याने शासकीय नियमांचा भंग करून हॉटेल, पावभाजी हातगाड्या मोठ्या प्रमाणात रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. रस्त्यावर चारचाकी वाहने आणि मोटार सायकल उभ्या करून काही तरुण महिला, मुलींची छेडछाड करून हुल्लडबाजी करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल आणि हातगाडी चालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -