घरमहाराष्ट्रभाजपने आणखीन ६ बंडखोरांची केली हकालपट्टी!

भाजपने आणखीन ६ बंडखोरांची केली हकालपट्टी!

Subscribe

भाजपनं गुरुवारी ४ बंडखोरांना घरी पाठवल्यानंतर शुक्रवारी अजून ६ बंडखोरांवर पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते देखील भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे विरोधी पक्षांना जरी घरघर लागली असली, तरी यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नवी समस्या निर्माण झाली. आयारामांना खूश करण्याच्या प्रयत्नात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरांची संख्या मात्र वाढली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दम भरल्यानंतर देखील ही बंडखोरी थांबली नाही. त्यामुळे अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ भाजपवर आली. गुरुवारीच ४ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा भाजपनं ६ बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हकालपट्टी करण्यात आलेल्यांची नावे

  • विनोद अग्रवाल, गोंदिया
  • सीमा सावळे, पिंपरी चिंचवड
  • सतीश होले, दक्षिण नागपूर
  • अशोक केदार, मेळघाट
  • गुलाब मडावी, गडचिरोली
  • राजू तोडसाम, आर्णी, यवतमाळ

भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरुवारी पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईत चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन(मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी-चिंचवड) आणि दिलीप देशमुख (अहमदपूर, लातूर) या चौघांना पक्षातून निलंबित केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -