घरमहाराष्ट्रएका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही - चंद्रकांत पाटील

एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही – चंद्रकांत पाटील

Subscribe

संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील चांगलेच भडकले आहेत.

‘आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूनच रोष पत्करुन आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही’, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली. संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील चांगलेच भडकले आहेत. ‘आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भाजपकडे काम घेऊन येऊ नका’, असे पाटील यांनी मंडलिक यांना सुनावले आहे.

हेही वाचा – निवडणूक रंगली नाही; कारण विरोधकच उरले नाहीत – उद्धव ठाकरे

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली तरीही दोन्ही पक्षांमधील धुसफस काही केल्या कमी होताना दिसत नाही. चंद्रपूर वगळता प्रत्येक जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरवर पाहता युती झालेली दिसत असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळली नसल्याचे पाहायला मिळत नाही. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे. या मतदारसंघात भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युती धर्म पाळला नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मांडलिक यांना खडेबोल सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -