घरमहाराष्ट्रशैक्षणिक वर्ष वाया गेल्याने शाळेला ५० हजारांचा दंड; द्यावी लागली नुकसान भरपाई

शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने शाळेला ५० हजारांचा दंड; द्यावी लागली नुकसान भरपाई

Subscribe

शाळेच्या भोंगळ कारभारावर लक्ष केंद्रीत करत राष्ट्रीय ग्राहक मंचाने शाळेला ५० हजारांची नुकसानभरपाई

हिमाचल प्रदेश येथे असणाऱ्या ड्यूनव्हॅली इंटरनॅशनल पब्लिक स्कूलने त्याच्या एका विद्यार्थाला वेळेत शाळेचा सोडल्याचा दाखला दिला नाही म्हणून शाळेला चांगलाच फटका बसला आहे. शाळा सोडल्याचा दाखला वेळेत न दिल्याने त्या विद्यार्थाचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. यामुळे शाळेच्या भोंगळ कारभारावर लक्ष केंद्रीत करत राष्ट्रीय ग्राहक मंचाने शाळेला ५० हजारांची नुकसान भरपाई देण्यास सांगून ५ हजार रूपये कायदेशीर कारवाईचा खर्च ९ टक्के व्याजाने द्यावे, असे निर्देश दिले आहे.

असा घडला प्रकार

हिमाचल प्रदेश येथे असणाऱ्या ड्यूनव्हॅली इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या रवलीन कौर या इयत्ता नववीच्या विद्यार्थीनीला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी शाळेत दाखल्याची मागणी केली होती. मात्र तो देण्यास शाळेने उशीर केला. शाळेने दाखला वेळेत दिला नाही म्हणून विद्यार्थीनीचे वर्ष वाया गेले. याकारणाने रवलीनच्या पालकांनी शाळेविरूद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल करून त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.

- Advertisement -

ही मागणी केल्यानंतर ग्राहक मंचाने ही मागणी फेटाळली होती. मात्र, राज्य ग्राहक आयोगाने पालकांची ही मागणी मान्य केली आहे. शाळा प्रशासन याविरूद्ध राष्ट्रीय ग्राहक मंचात गेले होते. परंतु राज्य आयोगाचा निर्णय अंतिम राहिला आहे.


हेही वाचा- झोमॅटो डिलिव्हरी बॉयने फरार केलेला ग्राहकाचा कुत्रा परतला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -