घरमुंबईनिवडणूक रंगली नाही; कारण विरोधकच उरले नाहीत - उद्धव ठाकरे

निवडणूक रंगली नाही; कारण विरोधकच उरले नाहीत – उद्धव ठाकरे

Subscribe

निवडणुकीचे वातावरण रंगताना दिसत नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता 'निवडणूक रंगली नाही, कारण विरोधकच उरले नाहीत', असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान होणार आहे आणि २३ ऑक्टोबरला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. फक्त ९ दिवस आता निवडणुकीला शिल्लक आहेत मात्र, यावेळी निवडणुकीचे वातावरण तितक्या प्रकर्षाने जाणवताना दिसत नाही, जितके दरवेळी असायचे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारांची मोठी धुमशान होती. दररोज वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्ये चर्चेत आली होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत तसे काही वक्तव्ये कुणाकडून ऐकू आलेली नाहीत. फार काही मोठ्या घडामोडी किंवा सभा गाजतांना दिसत नाहीत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण रंगताना दिसत नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ‘निवडणूक रंगली नाही, कारण विरोधकच उरले नाहीत’, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा – यंदाच्या निवडणुकीत दम नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी देखील उडवली विरोधकांची खिल्ली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा आज त्यांच्या निवासस्थानी प्रकाशित झाला. यावेळी विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. सध्या विरोधकांनी अगोदरच हार मानली आहे. त्यामुळे हल्ली निवडणुकीचे वातावरण दिसत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, अशाच प्रकारचे वक्तव्य काल, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुळीच दम राहिलेला नाही. कारण आमच्या विरोधात लढणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला आहेत. शाळेची लहान मुलेसुद्धा सांगतील की यंदा भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर येणार’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाची खिल्ली उडवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -