घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बुलढाणा येथे प्रचार दौरा आहे. मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे टी शर्ट घालून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असा संदेश लिहिलेले टी शर्ट घालून राजू तलवारे नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील खातखेड या गावातील ही घटना असून सकाळी ११ वाजता राजू तलवारे नामक युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बुलढाणा जिल्ह्यात नांदूरा, वरोडबाग आणि खामगाव येते तीन सभा होणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजू तलवारे यांनी आत्महत्या केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -