घरमुंबईनिवडणूक फ्लाईंग स्कॉटसोबत वाद घालणे महागात पडले; त्या अभिनेत्रीला अटक

निवडणूक फ्लाईंग स्कॉटसोबत वाद घालणे महागात पडले; त्या अभिनेत्रीला अटक

Subscribe

नाकाबंदी करणार्‍या निवडणूक फ्लाईंग स्कॉटसोबत वाद घालणे एका विदेशी अभिनेत्रीला चांगलेच महागात पडल्याची घटना मंगळवारी रात्री अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी तिच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. शीना लखानी असे या अभिनेत्री तरुणीचे नाव असून अटकेनंतर तिला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शीना ही मूळची कॅनडाची नागरिक असून तिथेच तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे. बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती काही महिन्यांपूर्वीच कॅनडा येथून मुंबईत आली होती. बॉलीवूडमध्ये काम मिळविण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. त्यात तिला यशही आले होते. तिने बॉम्बे ड्रिम्स, लव के फंडे आणि कॅश है तो अ‍ॅश है या बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. सध्या ती पवई येथे भाड्याच्या रुममध्ये राहत होती. मंगळवारी ती तिच्या एका मित्राकडे अंधेरीला आली होती. रात्री उशिरा ती मित्राच्या घरातून तिच्या पवई येथील घरी जात होती. यावेळी अंधेरीतील विरा देसाई रोडवर निवडणूक अधिकार्‍यांनी तिची कार अडविली. त्यांनी कारची झडती घेण्यास सुरुवात केली. हा प्रकार कॅमेर्‍यामध्ये कैद होत होता. मात्र तिने कारची झडती घेण्यास आक्षेप घेतला.

- Advertisement -

आपण विदेशी नागरिक असून बॉलीवूड अभिनेत्री असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक वाद झाला. याच रागातून तिने त्यांच्याकडील कॅमेरा हिसकावून घेऊन आतील मेमरी कार्ड काढले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या घटनेनंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध निवडणूक अधिकार्‍याने लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा –

पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -