घरविधानसभा २०१९मानखुर्द शिवाजीनगरमधून रिपाईचे सोनावणे निवडणुकीतून घेणार माघार

मानखुर्द शिवाजीनगरमधून रिपाईचे सोनावणे निवडणुकीतून घेणार माघार

Subscribe

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनावणे निवडणूकीतून माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनावणे निवडणुकीतून माघार घेणार आहेत. रिपाईतर्फे दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गौतम सोनावणे यांच्यासोबत बांद्रा येथे केली आहे. बांद्रा संविधान निवसस्थानी गौतम सोनावणे यांनी आज रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोले जात आहे.

ठाकरे आणि आठवले यांच्यात झाली चर्चा

राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तेथे रिपाईने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत उद्धव ठाकरे आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रिपाई मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी मानखुर्द शिवाजीनगर येथे दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून गौतम सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा त्यांना पुढील काळात सत्तेत चांगली संधी देऊन त्यांचे सन्मानाने सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे. तसेच राज्यात रिपाई भाजप शिवसेना महायुती अभेद्य असून महायुतीला विजयी करण्यासाठी रिपाई साथ देणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत. तर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा आदेश मान्य करून आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे गौतम सोनावणे यांनी कळविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींची उदयनराजेंसाठी साताऱ्यात पहिली सभा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -