घरमनोरंजन'कलावंत,खेळाडूंना ऑक्सीजन लागत नाही का?'

‘कलावंत,खेळाडूंना ऑक्सीजन लागत नाही का?’

Subscribe

आरे वृक्षतोड प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांनी मोठ्या सेलेब्रेटींवर निशाणा साधला आहे. कारण शुक्रवारी रात्री आरेमधील झाडांची कत्तल करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. पण गानकोकीळा लता मंगेशकर, मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरने यावर काहीच प्रतिक्रीया न दिल्यामुळेकार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांनी या दोघांवर संताप व्यक्त केला आहे.

विश्वंबर चौधरी म्हणातात, ‘ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणं सोडून दिलंय का? आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे की नाही? दरवेळी अण्णांकडूनच अपेक्षा नाही. ज्यांना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असे मोठे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात आहेत. साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सीजन लागत नाही? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?’ अस म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणं सोडून दिलंय का? आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे…

Vishwambhar Choudhari ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 6, 2019

शुक्रवारी रात्री आरेमध्ये वृक्ष तोडीला सुरूवात झाल्याचे कळताच पर्यावरण प्रेमींनी आपल्या मोर्चा आरेच्या दिशेने वळवत एकच गर्दी करायला सुरूवात केली. पण आंदोलनकर्त्यांची अपेक्षित गर्दी होणार हे पाहूनच याठिकाणी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. याठिकाणी आंदोलनकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतानाही सेव्ह आरेच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. याठिकाणची परिस्थिती काल रात्रीपासूनच चिघळल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेना सुप्रीम कोर्टा जाणार

उच्च न्यायालयाने मेट्रो-३ कारशेड संदर्भात दिलेल्या निकालाला शिवसेना आव्हान देणार आहे. आरे वृक्षतोड ही नियमबाह्य असून याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. रात्रीच्या अंधारात केलेली झाडांची कत्तल नियमबाह्य आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत हातात नसताना ही वृक्षतोड सुरु केली गेली, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -