घरमुंबईमुंबईकरांना झालंय काय? ३६ पैकी २१ मतदारसंघात मतदान घटलं!

मुंबईकरांना झालंय काय? ३६ पैकी २१ मतदारसंघात मतदान घटलं!

Subscribe

विधानसभा मतदानात मुंबईत्या ३६ मतदारसंघांपैकी तब्बल २१ मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी २०१४च्या निवडणुकीहून घटली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी आज राज्यातल्या २८८ मतदारसंघात मतदान झालं. मतदान झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता हाती आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यातल्या एकूण मतदानाची आकडेवारी ६०.४६ टक्क्यांवरच अडकली आहे. २०१४मध्ये ही आकडेवारी ६३.०८ टक्के इतकी होती. दरम्यान, मुंबईसाठी विचार करायचा झाल्यास, मुंबईत मतांचा टक्का खाली आला आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २१ मतदारसंघांमध्ये मतदानाची आकडेवारी खाली आली आहे. यामघ्ये जसा शिवसेनेचे युवा नेते आणि पहिले ठाकरे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे, तसाच घाटकोपरमधले चर्चेत राहिलेला घाटकोपर पूर्व मतदारसंघ देखील आहे. दरम्यान, टक्केवारी वाढलेल्या मतदारसंघांमध्ये नसीम खान यांच्या चांदीवली (८ %) आणि नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर (९ %) या मतदारसंघांचा समावेश आहे.

आदित्य ठाकरेंसाठी सोपा पेपर?

साधारणपणे मतांची टक्केवारी वाढते, तिथे प्रस्थापितांविरोधात मतप्रवाह असतो असं मानलं जातं. २०१४ ची निवडणूक याला अपवाद असली, तरी आधीच्या निवडणुकांमध्ये असाच काहीसा कल दिसून आला आहे. त्यानुसार आदित्य ठाकरेंचा वरळी आणि प्रकाश मेहता यांचं तिकीट कापून उमेदवारी दिलेले पराग शहा यांचा घाटकोपर पूर्व या तिनही मतदारसंघांमध्ये टक्केवारी घटली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा विजय होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

वडाळ्यात सर्वाधिक घट

मुंबईत सर्वाधिक टक्केवारी खाली आलेला मतदारसंघ म्हणजे वडाळा. वडाळ्यात ६१.२९ टक्क्यांवरून मतांनी थेट ५३.०८ टक्क्यांवर उडी घेतली आहे. या मतदारसंघातले कालीदास कोळंबकर यांनी निवडणुकांच्या आधी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचा त्यांना फायदा झाल्याचं चित्र दिसत आहे. त्याखालोखाल आशिष शेलार यांची उमेदवारी असलेल्या वांद्रे पश्चिममध्ये टक्केवारी ५१.२५ वरून थेट ४३.७६ टक्क्यांवर आली आहे. माजी बांधकाम मंत्री प्रकाश मेहता यांची उमेदवारी कापून पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आलेल्या घाटकोपर पूर्वमध्ये देखील मतांची टक्केवारी ५६.२४वरून ५०.५३वर आली आहे.


हेही वाचा – एक्झिट पोल म्हणतायत, पुन्हा महायुतीचंच सरकार!

टक्केवारी कमी झालेले इतर मतदारसंघ

  • कुलाबा – ४६.२० वरून ४०.२० टक्के
  • वरळी – ५५.७५ वरून ५०.२० टक्के
  • जोगेश्वरी पूर्व – ५५.५० वरून ५२.८९ टक्के
  • माहीम – ५८.५१ वरून ५३.२१ टक्के
  • शिवडी – ५४.२२ वरून ४९.४८ टक्के
  • मलबार हिल – ५२.५४ वरून ४७.२४ टक्के
  • भायखळा – ५४.७७ वरून ५१.१० टक्के
  • मुलुंड – ५७.४१ वरून ५३.२० टक्के
  • कांदिवली पूर्व – ५३.८१ वरून ५०.११ टक्के
  • सायन कोळीवाडा – ५२.७२ वरून ५०.७५ टक्के
  • धारावी – ४९.४१ वरून ४७.७९ टक्के
  • अंधेरी पश्चिम – ४६.५३ वरून ४३.२२ टक्के
  • गोरेगाव – ४८.४६ वरून ४६.६७ टक्के
  • मुंबादेवी – ४६.३२ वरून ४४.७१ टक्के
  • कुर्ला – ४६.७९ वरून ४५.३० टक्के
  • विले-पार्ले – ५२.९६ वरून ५२.६५ टक्के
  • कलिना – ५०.२३ वरून ५०.२० टक्के
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -