घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळ कुटुंब मतदानापासून दूरच

भुजबळ कुटुंब मतदानापासून दूरच

Subscribe

मनसेच्या नितीन भोसले यांचीही मतदानाला दांडी

लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगासह उमेदवार करत असतात. मात्र, आपल्या घराच्या पत्त्यापासून निवडणूक लढत असलेला मतदारसंघ दूर असला तर ते उमेदवारच मतदानाबाबत उदासीन असल्याचा प्रकार आज नाशिकमध्ये घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व त्यांचे कुटुंब येवला व नांदगाव मतदारसंघात अडकल्याने त्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानासाठी येऊ शकले नाहीत. तसेच, नाशिकमध्यमधील मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांनीही शेजारी असलेल्या पश्चिम मतदारसंघात जाऊन मतदान करणे टाळले. यामुळे उमेदवारांना मतदानाविषयी किती आस्था असते याची चर्चा सुरू आहे.

कुठलीही निवडणूक जाहीर झाली म्हणजे निवडणूक आयोग, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून प्रत्येकाना मतदान करावे यासाठी जनजागृती केली जाते. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे बजावून सांगितले जाते. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक आस्थापनांतर्फे सवलती जाहीर केल्या जातात. पण जेव्हा उमेदवारच आपला मतदानाचा हक्क बजावण्याबाबत उदासीन असतील तर त्याचा परिणाम सामान्यांवरही होत असतो. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येवला मतदारसंघातून व त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ शेजारच्या नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्याच्यासमोर कडवी लढत असल्याने भुजबळ कुटुंब अनेक दिवसांपासून या दोन्ही मतदारसंघामध्ये अडकले आहे. त्यांचे मतदान नाशिक पश्चिम मतदारसंघात आहे. मात्र, येवला व नांदगावहून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास किमान दोन तास लागणार असल्याने कदाचित कुटुंबातील कुणीही मतदानासाठी आले नाही. भुजबळ मतदानासाठी आले नसल्याचे सायंकाळी स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा रंगली होती.

- Advertisement -

नितीन भोसलेंचीही पाठ

मध्य नाशिक मतदारसंघातून मनसेचे नितीन भोसले उमेदवारी करत आहेत. त्यांचे मतदान शेजारच्याच पश्चिम मतदारसंघात आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचीही तसदी भोसले यांनी घेतली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -