घरमुंबईमुंबईसह उपनगरात १ लाखाहून अधिक 'नोटा'ला पसंती

मुंबईसह उपनगरात १ लाखाहून अधिक ‘नोटा’ला पसंती

Subscribe

मुंबईसह उपनगरात १ लाख ४१ हजार ७८१ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीला सत्तेच्या मार्गावर नेऊन ठेवले आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपच्या बाजूने कौल दिला असला तरी मुंबईतील ‘नोटा’ला अधिक पसंती मिळाली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक उमेदवारांना उमेदवारी न मिळणे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी केलेली बंडखोरी तर अनेकांनी केलेला पक्ष बदल या सर्व कारणांमुळे एकूणच राजकारणाविषयी मतदांच्या मनात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. परिणामी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या १ लाखाहून अधिक झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मिळून १ लाख ४१ हजार ७८१ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.

जोगेश्वरीत सर्वात अधिक नोटाला पसंती

२०१४ सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि २०१९ ची लोकसभा विधानसभा निवडणूक यांची तुलना करता ‘नोटा’ चा आलेख वाढल्याचे दिसून येत आहे. जागेश्वरी आणि बोरीवली विधानसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक नोटांचा वापर मतदारांनी केला आहे. जागेश्वरी मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रविंद्र वायकर हे उमेदवार असून तब्बल १२ हजार मतदारांनी वायकर यांना मतदान करण्याऐवजी नोटांचा वापर करत वायकर हे उमेदवार म्हणून पसंती नसल्याचीच पावती दिली आहे. जोगेश्वरी पूर्व पाठोपाठ बोरीवली मतदारसंघातही १० हजार ९५ मतदारांनी नोटांचा वापर केला आहे. तर मुंबादेवी येथे सर्वात कमी म्हणजे १ हजार ५३९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ ‘नोटा’चा पर्याय निवडण्यात आघाडीवर आहे. तर मुंबई दक्षिण – मध्य लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदारांनी नोटा निवडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘नोटा’मध्ये जोगेश्वरी आघाडीवर; बोरीवली दुसर्‍या स्थानावर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -