घरमहाराष्ट्रनिलेश राणेंचा युटर्न; म्हणाले, 'नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही'

निलेश राणेंचा युटर्न; म्हणाले, ‘नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही’

Subscribe

शिवसेनेशी जुळवून घेण्याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या दोन्ही चिरंजीवांमध्ये मतभेद असल्याचे निदर्शनास आले आहे. नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपण आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर थोरले बंधू निलेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी काल ट्वीट देखील केले होते. मात्र, निलेश यांनी आज पुन्हा यासंदर्भात दुसरे ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या भुमिकेत बदल केल्याचे दिसून येते. नितेश यांच्या निर्णयावर आक्षेप घेणारे निलेश राणे यांनी ‘आपण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही’, असेही म्हणाले आहेत.

हेही वाचा – शिवसेनेशी जुळवून घेण्याबाबत राणे भावंडातच जुंपली

- Advertisement -

…त्यादिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल – निलेश

निलेश राणे यांनी नितेश यांच्या वक्तव्यावर ट्विट करत आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्विटवर त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. ‘आपल्या ट्विटचा गैर अर्थ काढण्यात आल्याचे ते नव्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. यासोबतच शिवसेना आपले वडील नारायण राणे यांची बदनामी करायचे आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी आपला आणि शिवसेनेचा विषय संपेल’, असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

काय होते निलेश यांचे पहिले ट्विट?

‘शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीही सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरुनच करणार’, असे निलेश राणे म्हणाले होते.

काय म्हणाले होते नितेश राणे?

‘जर आदित्य ठाकरे विधिमंडळाचं कामकाज समजून घेण्यासाठी, कायद्यांची निर्मिती कशी होते हे समजून घेण्यासाठी निवडणूक लढवत असतील तर त्याचं स्वागत व्हायला हवे. महाराष्ट्राच्या विकासात आणि जडण-घडणीत ते आमच्यासोबत बसून, आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो. विधानसभेच्या पायर्‍यांवर त्यांची भेट व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची माझी इच्छा आहे’, असे नितेश राणे म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -