घरमहाराष्ट्रनितेश राणेंना आजच मिळणार भाजपचा एबी फॉर्म?

नितेश राणेंना आजच मिळणार भाजपचा एबी फॉर्म?

Subscribe

राणे कुटुंबापैकी कुणालाही भाजपमध्ये न घेता नितेश राणेंना थेट कणकवलीमधून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचा एबी फॉर्म देण्याचा निर्णय भाजपच्या अंतर्गत गोटात घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव आमदार नितेश आणि निलेश राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या तारखांवर तारखा समोर देखील येत होत्या. मात्र, या तारखांना काही राणेंचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. पण आता नितेश राणे यांना भाजप प्रवेश न देताच उमेदवारी देणार असून, आज नितेश यांना एबी फॉर्म देखील देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हिरीभाऊ बागडे यांच्या खासगी सचिवाकडे दिला होता. त्यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता नितेश राणे निघून गेले होते. त्यामुळे पुन्हा राणेंना भाजपने हिरवा कंदील दिला नाही अशी चर्चा रंगली होती.

आदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?

- Advertisement -

म्हणून प्रवेश न देता मिळणार उमेदवारी

राणेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा कडाडून विरोध आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते देखील राणेंना भाजप प्रवेश देऊ नये, अशी मागणी वारंवार करत आहेत. त्यामुळेच येत्या काळात पक्षांतर्गत वाढणारी नाराजी पाहता राणेंना भाजप प्रवेश न देता नितेश राणे यांना थेट कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करायची असा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती मिळत आहे. नितेश राणे हे चार तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील, असे राणे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

नितेश राणेंचं सूचक ट्वीट

दरम्यान, मंगळवारी रात्री नितेश राणेंनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ‘फक्त काही तास बाकी (वादळापूर्वीची शांतता)’, असं ट्वीट केल्यामुळे त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. काहींच्या मते हे राणेंच्या भाजप प्रवेशासंदर्भातलं ट्वीट होतं. मात्र, आता नितेश राणेंनाच भाजपचा एबी फॉर्म मिळणार असल्याचं समोर येत आहे.


हेही वाचा – नितेश राणे म्हणतात ‘वादळापूर्वीची शांतता, फक्त काही तास बाकी’!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -