घरमहाराष्ट्रयावेळी पारदर्शकपणे सत्तेचे वाटप करु - उद्धव ठाकरे

यावेळी पारदर्शकपणे सत्तेचे वाटप करु – उद्धव ठाकरे

Subscribe

लोकशाहीला जेव्हा गृहीत धरून काही लोक चालत असतात, तेव्हा जनता त्यांना जमिनीवर आणण्याचे काम करते. कोणत्याही दडपणाला बळी न पडता लोकांनी मतदान केले. लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली याचा मला अभिमान आहे. जनतेने जो जनादेश दिला आहे, तो आमच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारा आहे. या निकालानंतर आता कुणी ईव्हीएमवर प्रश्न विचारणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे – 

जनतेने ज्या आशेने आणि अपेक्षेने आमच्याकडे राज्य दिले आहे, त्या अपेक्षा पुर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. निवडणुकीआधी भाजप-सेनेमध्ये १४४ – १४४ असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी सांगितल्या होत्या, त्यामुळे आम्ही कमी जागा घेतल्या. मात्र यावेळी त्यांच्या आणखी काही अडचणी असतील तर मी समजून घेऊ शकत नाही, कारण मलाही माझा पक्ष चालवायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

- Advertisement -

पारदर्शकपणे सत्तेचे वाटप करु

भाजपला एकहाती सत्ता मिळवता आलेली नसल्यामुळे शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद घेणार का? असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “निकालातून जनतेने डोळ्यात अंजन घातल्यानंतर अजूनही आम्ही डोळे चोळत चोळत जर मुख्यमंत्रीपदासाठी भांडत राहिलो तर ते काही योग्य होणार नाही. जनतेला चांगले सरकार देणे, हेच आमच्या समोरचे प्रमुख उद्देश आहे.”

सत्तेसाठी वेडं वाकडं करणार नाही

भाजपने कमी जागा मिळवल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची शिवसेनेला सत्ता स्थापनेची ऑफर आहे, ही ऑफर स्वीकारणार का? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेसाठी काही वेडं वाकडं काही स्वीकारणे माझ्या रक्तात नाही, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले. तसेच मातोश्रीचा मतदारसंघ मानला जाणारा वांद्रे पुर्वमध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला आहे. “वांद्रे पूर्वची जागा ही परळीप्रमाणेच होती,  या दोन्ही जागा गेल्याची खंत” असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मागच्यावेळी स्वबळावर जागा लढवून आमच्या जास्त जागा आल्या होत्या, आता या विषयावर बोलण्यात अर्थ नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -