घरमहाराष्ट्रशिवसेना विरोधातील 'त्या' वक्तव्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचा पराभव?

शिवसेना विरोधातील ‘त्या’ वक्तव्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचा पराभव?

Subscribe

हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्य टीकेमुळेच त्यांचा पराभव झाल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीचा कालावधी जसजसा जवळ येत होता तसतसा आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या होत्या. याच गदारोळामध्ये कन्नड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्य शब्दांत टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेमुळे राज्यभरातील शिवसैनिक नाराज झाले होते. याशिवाय त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्य टीकेमुळेच त्यांचा पराभव झाल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.


हेही वाचा – शिवसेना विरोधातील ‘ते’ वक्तव्य भोवलं; हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

- Advertisement -

 

कन्नडमध्ये शिवसेनेचे उदयसिंग राजपूत विजयी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांचा विजय झाला आहे. उदयसिंग राजपूत यांना ७९,२२५ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना ६०,५३५ मते मिळाली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचा १८,६९० मतांनी पराभव झाला आहे. गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उदयनसिंग आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली होती. मात्र, त्यावेळी हर्षवर्धन शिवसेनेचे तर उदयसिंग राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी हर्षवर्धन यांचा १५६१ मतांनी विजय झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली; उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -