घरमहाराष्ट्रमाळशिरसमधून ऊसतोड कामगाराचा मुलगा विजयी

माळशिरसमधून ऊसतोड कामगाराचा मुलगा विजयी

Subscribe

माळशिरसमधून ऐनवेळी उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपाने सर्वसामान्य राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या राम सातपुते यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या माळशिरसमधून ऐनवेळी उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपाने सर्वसामान्य राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती.

विद्यमान आमदाराचे निधन 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस राखीव मतदारसंघाचे आमदार हनुमंत डोळस यांचे एप्रिल २०१९ रोजी आतड्याच्या कर्करोगाने निधन झाले होते. माळशिरस तालुक्यातील दसुर हे डोळस यांचे मूळ गाव आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हनुमंत जगन्नाथ डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लढले असून ७७ हजार १७९ मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये अपक्ष अनंत खंडागळे हे विरूद्ध उभे होते. या शिवसेनेचे शहाजी पाटील यांचा ६ हजार २४५ मतांनी पराभव झाला होता.

- Advertisement -

कोण आहे राम सातपुते 

राम सातपुते यांनी भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपदही सांभाळले आहे. राम सातपुते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क आहे. राम यांचे आई-वडिल ऊसतोडी करत होते. भाजपानेही एका उसतोड कामगाराच्या मुलाला आमदारकीचे तिकीट देऊन सध्याच्या राजकीय घराणेशाहीला फाटा दिला. जनतेनेही या निर्णयाला मतपेटीतून कौल दिल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -